पालकमंत्री कुठे दिसत नाही, मनसे आमदार राजू पाटील यांचा खोचक प्रश्न

MNS Raju Patil - Maharashtra Today

ठाणे : कोरोनाच्या (Corona) वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. केडीएमसीत प्रशासक म्हणून आयुक्त आहेत. महापौर नाही. मात्र पालकमंत्री कुठे आहेत? असा खोचक सवाल मनसे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी उपस्थित केला आहे. तसेच लवकरात लवकर पालकमंत्र्यांनी कोरोना उपाययोजनांबाबत आढावा बैठक घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

राजू पाटील यांनी डोंबिवलीत दोन ठिकाणी स्मशानभूमीची जागा उपलब्ध करुन त्वरीत काम सुरु करावे, अशी मागणी आयुक्तांकडे केली. इतकेच नाही तर लसीकरणासाठी कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती न घेता प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी दर्शविली. कल्याण डोंबिवली महापालिकेत कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. मृत्यू संख्या वाढत चालली आहे. बेडसासाठी रुग्णांना भटकावे लागत आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा पत्ता नाही. अश्या गंभीर परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आमदार राजू पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत आणि त्यांचे सहकारी हरीष जोशी यांनी केडीएमसी आयुक्ताची आज सायंकाळी भेट घेतली. ही कठीण परिस्थिती रोखण्यासाठी काही सूचना राजू पाटील यांनी आयुक्तांना केल्या. मुख्यत: लसीकरणाच्या कामासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी दर्शविली. लसीकरण काही केंद्रांवर सुरु आहे. मात्र लसीचे डोस कमी प्राप्त होतात. तेव्हा आधी केंद्रे जास्त उभारा. लस मिळाल्यानंतर लसीकरण थांबणार नाही याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button