अब्दुल सत्तार शिवसेनेत राहतील याची गॅरंटी कुठे आहे? भाजप नेत्याचा सवाल

Raosaheb Danve - Abdul Sattar

मुंबई : भाजप (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर निशाणा साधला आहे .

सत्तार शिवसेनेत (Shiv Sena) राहतील याची गॅरंटी कुठे आहे? पहिले अपक्ष, मग काँग्रेस (Congress) आणि आता शिवसेनेत, असा टोला दानवे यांनी त्यांना लगावला आहे . घाबरू नका, कोरोना संपल्यावर आपलीच सत्ता येईल. आणि सत्तार मला भेटायला भोकरदनला येतील आणि बोलतील फडणवीसांना भेटायला जाऊ या, असेही दानवे म्हणाले.

राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि मित्र नाही. अब्दुल सत्तारसारखा नेता महाराष्ट्रात नाही, सगळ्यांना मदत करतो आणि निवडून आल्यावर नावं ठेवतो. यावेळेला मी तुम्हाला मदत केली नाही; कारण मला याआधीच माहिती होतं शिवसेना काय करणार आहे, असेही दानवे म्हणाले.

दरम्यान भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना शिवसेनेत येण्याची खुली ऑफर अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीका केली; शिवाय खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER