सानपांच्या जाण्याने नुकसान व्हायला फायदा तरी कुठे झाला? – संजय राऊत

Balasaheb Sanap - Sanjay Raut

मुंबई :- शिवसेनेतून (Shiv Sena) भाजपामध्ये घरवापसी करणारे बाळासाहेब सानप (Balasaheb Sanap) यांनी सोमवारी भाजपात (BJP) प्रवेश केला. या संदर्भात बाळासाहेब सानप यांच्या जाण्यामुळे शिवसेनेचे नुकसान झाले का, या प्रश्नाच्या उत्तरात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत, बाळासाहेब सानप यांच्या येण्याने शिवसेनेला कोणताही फायदा झाला नव्हता. त्यामुळे नुकसानीचा प्रश्नच नाही!

शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी सोमवारी भाजपमध्ये घरवापसी केली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत सानप यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. बाळासाहेब सानप यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेकडूनही पक्षप्रवेशाचा धडाका सुरु करण्यात आला आहे. नाशिक आणि धुळे जिल्ह्यातून भाजपायाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

ही बातमी पण वाचा : टीका सारण्यासाठी भाजपाला ‘भारतरत्न’ मिळाला पाहिजे – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER