इतकी कडक नशा कुठून आणतात? भाजपाचे नरोत्तम मिश्रा यांचा राहुल गांधींना टोमणा

Narottam Mishra-Rahul Gandhi

भोपाळ : चीनशी सुरु असलेला सीमावाद आणि कृषी कायद्यांवरून केंद्राताली मोदी सरकारवर ताळतंत्र सोडून टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना मध्य प्रदेशचे गृहमंत्री आणि भाजपाचे नेते नरोत्तम मिश्रा (Narottam Mishra) टोमणा मारला – इतकी कडक नशा हे कुठे आणतात?

“काँग्रेसचे सरकार असते तर १५ मिनिटात चीनला हाकलले असते ! असे राहुल गांधी ‘शेती वाचवा’ आंदोलनात बोलताना म्हणाले. याच्या संदर्भ घेऊन मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी पत्रपरिषदेत राहुलला टोमणा मारला – दहा दिवसांत कर्जमाफी, १५ मिनिटांत चीनला साफ करणार! मी त्या गुरूंना नमन करतो ज्यांनी राहुल गांधींना शिकवले. मला एक समजत नाही की, इतकी कडक नशा हे कोठून आणतात?”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER