कुंभमेळा संपल्यावर नागा साधू कुठं जातात? 

भारतात सण, वार,उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात. दिवाळी, गणपती, नवरात्री सण साजरे होतात. गावोगावी यात्रा जत्रा भरतात. पण एक उत्सव असा असतो जो दर चार वर्षातून एकदा भरतो. तो महोत्सव म्हणजे कुंभमेळा (Kumbh Mela). जिथं देशभरातून लाखो भाविक हजरी लावतात. गेल्या काही वर्षांपासून कुंभमेळ्यासाठी परदेशातूनही भक्त येतात. पण कुंभमेळ्याचं आकर्षण असतात फक्त नागासाधू (Naga sadhus).

कुंभमेळा संपल्यावर नागासाधू कुठं जातात? काय करतात? काय खातात? कुठं राहतात? असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात येत असतील. नागासाधूंबद्दल अत्यल्प माहिती उपलब्ध असल्यामुळं त्यांच्याबद्दल समाज मनात प्रचंड कुतुहल असते.

मागच्या वर्षी प्रयागराजमध्ये कोरोनाची खबरदारी घेत कुंभमेळा पार पडला. या कुंभमेळ्यात नागासाधूंची उपस्थिती अत्यल्प होती.  नागासाधू प्रमुखपणे अर्धकुंभ, महाकुंभ मेळ्यात दिसतात.

कसे बनतात नागासाधू

नागासाधू बनणं फार कष्टाचे काम आहे. यासाठी खुप परिश्रम घ्यावे लागतात. नागासाधूंना धार्मिक प्रतिष्ठा प्राप्त असते. नागासाधू होण्यासाठी नागा आखाड्यात जावे लागते.  एखाद्याला नागासाधू व्हायची इच्छा असेल आणि त्याने आखड्याशी संपर्क साधला तर त्याची संपूर्ण माहिती आखाड्यांच्यावतीनं घेतली जाते. त्यानंतर त्याला प्राथमिक परिक्षेला समारं जावं लागतं. आखाड्यातील साधूंना जर वाटले की या व्यक्तीत नागा होण्याच्या क्षमता आहेत तरच त्याला पुढच्या परिक्षेला पाठवलं जातं. यानंतर त्याला वैराग्य, ब्रम्हचर्य, धर्म आदींची दिक्षा देण्यात येते. त्यानंतर त्याला पुढं पाठवलं जातं. या प्रक्रियेसाठी म्हणजे दिक्षा मिळण्यासाठी १ वर्ष ते १२ वर्षांचा कालावधी लागू शकतो.

या दरम्यान नागा साधू त्या व्यक्तीचे मुंडन करतात. नंतर त्याच्याकडून पिंडदान करवून घेतलं जातं. म्हणजेच सर्व नातेवाईकांच्या पिंडदान करुन त्यावर पाणी सोडण्याची क्रिया. त्याच्यासाधी सर्वच नातेवाईक मरण पावले आहेत असे समजण्यासाठी हे पिंडदान केलं जातं. या विधीनंतर नागासाधू होऊ इच्छणाऱ्या व्यक्तीला स्वतःचेदेखील श्राद्ध घालावं लागतं. जगाशी असलेले सारे संबंध तोडले जातात. कपड्यांऐवजी भस्म हाच त्यांचा पेहराव बनतो.

भस्म म्हणजे काय?

अनेक नागासाधूंच्या अंगावर राख माखलेली दिसते. धार्मिक भाषेत याला राख असं म्हणलं जातं. हे भस्म चितेच्या राखेपासून बनवलं जातं. चितेच्या राखेला शुद्ध करुन नागासाधू त्याचा वापर भस्म म्हणून करतात. कुंभ मेळ्यात भस्म अंगाला लावून नागासाधू तिथं उपस्थित असतात पण  कुंभमेळ्यानंतर नागासाधू कुठं जातात, हे मात्र समजत नाही. आपण जिथं राहतो. जिथं फिरतो तिथंही ते सापडंत नाही.

इथं असतात नागासाधू

एकांतवास भेटावा म्हणून नागासाधू  गुफांमध्येच घर करुन राहतात. कुंभ मेळा संपल्यावर  नागासाधू जंगलात भटकतात. त्यांना जंगलाची भिती नसते.  नागासाधूंनी साधनेतून त्यांच मन आणि शरिर कणखर बनवले असते.सर्व प्रकारच्या प्रतिकुल परिस्थीतीवर मात करण्याच्या क्षमता त्यांनी विकसीत केल्या असतात. ते दिवसभरात फक्त एकाच वेळचं जेवण करतात. नागासाधूंचे जीवन रहस्यांनी भरलेले असते. त्यांच्यावर तसे अनेक माहितीपट बनलेत.

नागासाधूंचा इतिहास आणि वर्तमान परिस्थीती

इसवी सन पूर्व पाचव्या शतकापासून भारताचे ऐश्वर्य लुटण्यासाठी परकीय आक्रमणांना सुरुवात झाली. अनेक मंदिरांना याचा धोका होता. परमेश्वरांच्या उपासकांचे सशस्त्र सैन्यदल असावं अशी अनेकांची इच्छा होती. यातून सशस्त्र अध्यात्मवादी लोकांची फळी उभा झाली. ज्यांना नागासाधू म्हणून ओळखलं गेलं. नागासाधूंनी त्यावेळी आखाडे उभारले होते. त्यातले काही प्रमुख आखाडे आजही अस्तिवात आहेत.

भारतीय स्वातंत्र्यानंतर नागासाधूंनी सैनिकी चरित्राचा त्याग केला आणि पुर्णपणे गुढमार्गाने जीवन जगण्याचा त्यांनी निर्णय घेतला. भारतात प्रामुख्याने श्री निरंजन आखाडा, श्री जानूदत्त जुना आखाडा, श्री महानिर्वाण आखाडा, श्री अटल आखाडा, श्री आनंद आखाडा, श्री नागपंथी गोरखनाथ आखाडा, श्री उदासीन नया आखाडा, निर्मोही आखाडा असे प्रमुख आखाडे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER