आमदार, खासदारांच्या निधीचे पैसे गेले कुठे ? : उदयनराजे यांचा सवाल

Udyanraje

सातारा : कोरोनाच्या उपचारासाठी बेड, व्हेंटिलेटरचा तुटवडा जाणवत आहे. आमदार, खासदारांच्या निधीचे पैसे गेले कुठे, याचे उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने दिले पाहिजे? असा सवाल खा. उदयनराजे भोसले (Udayan Raje Bhosle) यांनी उपस्थि केला आहे.

विजयादशमी निमित्त काल (रविवारी) जलमंदिर पॅलेस येथे उदयनराजे यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन यंदा शाही मिरवणूक रद्द करण्यात आली.

उदयनराजे म्हणाले की, देशातील सर्व खासदार आणि आमदारांचे दोन वर्षातील संपूर्ण खासदार, आमदार निधी वर्ग करून घेतल्याने लोक आम्हाला जाब विचारत आहेत. मी केवळ राज्यपुरता न बोलता हा निधी नेमके गेला कुठे? कोरोना काळात प्रत्येकाला बेड, व्हेंटिलेटरची कमतरता भासत आहे. मग एवढे खासदार, आमदार निधीचे पैसे गेले कुठे याचे उत्तर केंद्र आणि राज्य शासनाने देणे गरजेचे आहे. आई भवानी राज्यकर्त्यांना बुद्धी दे. ज्या लोकांनी राज्यकर्त्यांना निवडले त्यांची काळजी नाही. त्यामुळे लोकांच्या विश्वासाला पात्र नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER