काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे कुठे लपले? – बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat sad

मुंबई :- देशात वाढत चाललेल्या महागाईने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. भाजपनं सत्तेत येण्यासाठी दिलेली आश्वासनं, वाढती महागाई, कोरोना (Corona) स्थितीवरून काँग्रेसने (Congress) मोदी सरकारवर (Modi Government) निशाणा साधला.

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे काँग्रेसने राज्यभरात ठिकठिकाणी निषेध नोंदवला आहे. तसेच पत्रकार परिषदा आणि कार्यक्रम घेऊन मोदी सरकारच्या कारभाराची पोलखोल केली आहे. नाशिक येथे काँग्रेसचे प्रमुख नेते आणि महसलूमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पत्रकार परिषद घेतली.  यावेळी त्यांनी मोदी सरकारवर, भाजपवर टीका केली.

बाळासाहेब थोरात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधताना भाजपनं दरवर्षी दोन  कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची आठवण करून दिली. भाजप (BJP) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकण्याचं आश्वासन दिलं होतं. काळा पैसा भारतात आणणार असं म्हटलं होतं, ही आश्वासनं पूर्ण झाली नसल्याचा आरोप थोरात यांनी केला.

आता पेट्रोलने सेंच्युरी मारली आणि गॅसचे भाव  वाढले आहेत. काँग्रेसच्या काळात महागाईवर आंदोलन करणारे आता कुठं लपून बसले आहेत, असा सवालही थोरात यांनी केला. महागाई वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे गेले. कच्च्या  तेलाच्या किमती कमी झाल्या तरी आपल्याकडे वाढ सुरू आहे. खाद्यतेल ६० रुपये  लिटर होते  ते २०० रुपयांवर  गेले  आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button