असहिष्णूतेची चर्चा करणारे आता कुठे गेले?; संजय राऊतांच्या टिप्पणीवर कंगनाचा सवाल

SAnjay Raut & Kangana

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यात सध्या वादंग उठले आहे . नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय राऊत यांनी कंगनावर अवार्च्य भाषेत टीका केली होती . त्याला आता कंगनाने ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय. असहिष्णूतेची चर्चा करणारे योद्धे आता कुठे गेले, असा सवाल तिने उपस्थित केला आहे .

‘२००८ मध्ये मूव्ही माफियाने मला वेडं ठरवलं, २०१६ मध्ये मला चेटकीण आणि दुसऱ्यांवर सतत लक्ष ठेवणारी म्हणाले. आता २०२० मध्ये एकाच्या हत्येनंतर मला मुंबईत सुरक्षित वाटत नाही असे म्हटल्यावर महाराष्ट्राचे मंत्री मला हरामखोर मुलगी म्हणतात. असहिष्णूतेची चर्चा करणारे योद्धे आता कुठे गेले’, असा प्रश्न उपस्थित करणारे ट्विट कंगनाने केले आहे .

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. तिन ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER