जेव्हा फ्लॉप चित्रपटांमुळे झीनत अमानला सोडायचं होतं बॉलिवूड

Zeenat Aman

१९७०-८० च्या दशकात झीनत अमानचे (Zeenat Aman) नाव लोकप्रिय झाले होते. ग्लॅमरच्या चकाकीत झीनतचे सौंदर्य दुरूनच चमकत होते. पण बॉलिवूडमध्ये तिचा डेब्यू काही खास नव्हता. देव आनंद नसते तर कदाचित झीनत या टप्प्यावर पोहचली नसती.

झीनत अमानचा जन्म १९ नोव्हेंबर १९५१ रोजी मुंबई येथे झाला. चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी ती पत्रकार होती. त्यानंतर तिने मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला आणि वयाच्या १९ व्या वर्षी फेमिना मिस इंडियाचे जेतेपद जिंकले. १९७० मध्ये तिने मिस एशिया पॅसिफिक आंतरराष्ट्रीय जेतेपदही जिंकले.

१९७० मध्ये झीनतने ‘द एविल विदइन’ आणि १९७१ मध्ये ‘हलचल’ चित्रपटांमध्ये भूमिका केली होती. हे चित्रपट फ्लॉप होते; पण लोकांना झीनत अमान खूप आवडली होती. हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे झीनत खूप निराश झाली होती आणि तिने बॉलिवूडमध्ये काम न करण्याचे ठरवले होते.

देव आनंद यांच्या सांगण्यानुसार, झीनतने ‘हरे राम हरे कृष्णा’ या चित्रपटात देव आनंद यांच्या बहिणीची भूमिका साकारली आणि त्यानंतर झीनतची चर्चा खूप होती. या चित्रपटासाठी झीनतला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.

वर्ष १९७८ मध्ये झीनत अमानने ‘सत्यम शिवम सुंदरम’ या चित्रपटामध्ये एक बोल्ड सीन देऊन खळबळ उडवली होती. चित्रपटावर चौफेर टीका झाली; पण असे असूनही झीनतला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले. यानंतर तिची प्रतिमा ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री बनली.

झीनत अमानने हीरा पन्ना (१९७३), प्रेमशास्त्र (१९७४), वारंट (१९७५), डार्लिंग (१९७७), कलाबाज (१९७७), डॉन (१९७८), धरम वीर (१९७७), छलिया बाबू (१९७७), द ग्रेट गॅम्बलर (१९७९), कुर्बानी (१९८०), अलीबाबा और चालीस चोर, दोस्ताना (१९८०) आणि लावारिस (१९८१) यासारख्या चित्रपटांत काम केले.

ही बातमी पण वाचा : विद्या सिन्हाने वयाच्या १८ व्या वर्षीच केली होती आपल्या कारकिर्दची सुरुवात,…

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER