मैदानात आल्यावर कळेल ‘नागडं’ कशाला म्हणतात; निलेश राणेंचा संयज राऊतांना टोमणा

Nilesh Rane - Sanjay Raut

मुंबई : वर्षा राऊत यांना ईडीची (ED) नोटीस मिळाल्यानंतर संतापलेले संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला दम दिला होता – नंगा आदमी हूँ, माझ्या नादी लागू नका. यावर भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत यांची टिंगल केली. मैदानात आल्यावर कळेल त्यांना ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘मै नंगा हूँ’.

याबाबत राणे यांनी ट्विट केले – “संजय राऊतांसारखे मर्दानगीची वार्ता करतात यासारखे हास्यास्पद काही नाही. ज्यांनी आयुष्य एका खोलीत बसून काढले ते मैदानात लढण्याची वार्ता करतात, मैदानात आल्यावर कळेल त्यांना ‘नागडं’ कशाला म्हणतात. मग म्हणतच बसावं लागेल ‘ मै नंगा हूँ’. एका नोटीसला इतके घाबरले संजय राऊत!” याचप्रमाणे संजय राऊतांच्या समर्थकांनी मुंबईतील बॅलार्ड इस्टेट येथील ईडीच्या कार्यालयाबाहेर भाजप प्रदेश कार्यालयाचा फलक लावला.

तर काही ठिकाणी शिवसैनिकांनी, भाजपला उद्देशून, आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल, असे फलक लावले. यावर नेते निलेश राणे यांनी शिवसेनेची टिंगल उडवताना ट्विट केले, “शिवसैनिकांनी काही ठिकाणी पोस्टर लावले. आम्ही मागे लागलो तर तुम्हाला देश सोडावा लागेल.

देशाबाहेर नोकरी द्यायचा धंदा सुरू केला की काय शिवसेनेने? की देशाबाहेर लग्न लावून द्यायचे काम हाती घेतले? या दोन व्यवसायांच्या मार्केटिंगसाठी हे वाक्य सॉलिड आहे.” असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर हल्लाबोल केला.

 

ही बातमी पण वाचा : तुम लाख कोशिश कर लो, मुझे बदनाम करने की …; संजय राऊत यांचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER