जेंव्हा महिलांचे टेनिस सामने पुरुषांपेक्षा अधिक काळ चालले

Tsvetana Pironkova - Alizé Cornet

व्यावसायिक टेनिसमध्ये (Tennis) नेहमीच एक वाद रंगतो की महिला खेळाडूंना पुरुषांच्या बरोबरीने बक्षीस रक्कम (Prize Money) द्यावी की नाही. महिला गटातून याचे समर्थन असले तरी पुरुष गटातून मात्र तेवढे अनुकूल मत नसते आणि विरोधकांचा दावा असतो की, महिलांचे सामने असतात कमाल तीन सेटचे (बेस्ट ऑफ थ्री) आणि पुरुषांचे सामने असतात कमाल पाच सेटचे (बेस्ट ऑफ फाईव्ह). असे असताना महिलांना पुरुषांच्या बरोबरीने बक्षीस का द्यावे? तीन सेट आणि पाच सेटमध्ये जसा फरक आहे तसा बक्षीस रकमेतही असायला हवा. या समजाला तडा देणारी आणि काहीशी आश्चर्यजनक घटना यंदाच्या यूएस ओपनच्या (US Open) चौथ्या फेरीच्या सामन्यांमध्ये घडली.

मंगळवारी खेळल्या गेलेल्या महिलांच्या चौथ्या फेरीचे तीन सामने हे त्याच दिवशी खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या तीन सामन्यांपेक्षा अधिक काळ चालले. असे व्यावसायीक टेनिसमध्ये क्वचितच घडते.

उदाहरणच द्यायचे झाले तर स्वेताना पिरोन्कोव्हाने एलिस कॉर्नेटवर (Alizé Cornet) 6-4, 7-6, 6-3 असा विजय मिळवायला दोन तास 49 मिनीटे वेळ घेतला तर आंद्रे रुबलेव्हने मारियो बेरेंटीनीवर 4-6, 6-3, 6-3, 6-3 असा विजय मिळवला तो सामना दोन तास 42 मिनीटात आटोपला.

तर महिलांचे पुरुषांपेक्षा अधिक काळ चाललेले हे सामने असे…

सामना वेळ

1) पिरोन्कोव्हा वि. वि. कॉर्नेट – 2 तास 49 मिनीटे
1) रुबलेव्ह वि. वि. बेरेंटीनी – 2 तास 42 मिनीटे

2) अझारेंका वि. वि. मुचोव्हा – 2 तास 30 मिनीटे
2) डी मिनोर वि.वि. पॉस्पीसील- 2 तास 17 मिनीटे

3) सेरेना वि.वि. सक्कारी – 2 तास 28 मिनीटे
3) थिएम वि.वि. अलैस्सिमे- 2 तास 07 मिनीटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER