फडणवीस सरकारने मंजूर केलेले प्रकल्प पूर्णत्वास कधी नेणार? रवींद्र चव्हाणांची विचारणा

Devendra Fadnavis - Ravindra Chavan -Maharashtra Today

ठाणे : कल्याण-डोंबिवलीतील विकास कामांच्या श्रेयावरून शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये (BJP) चांगलाच वाद रंगला आहे. कुणाला कितीही पोस्टर लावू द्या. त्याने काय होणार आहे. कोण किती करत आहे आणि मदतीला कोण धावून जात आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे, असा खरमरीत टोला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे नाव न घेता लगावला. त्याला रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने कल्याण-डोंबिवलीसाठी प्रकल्प मंजूर केले होते. ते रखडलेले आहेत. हे प्रकल्प कधी पूर्णत्वास नेणार? असा प्रश्न रवींद्र चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कल्याण-डोंबिवलीसाठी अनेक प्रकल्प मंजूर केले होते. ते प्रकल्प रखडलेले आहेत. हे प्रकल्प कधी पूर्ण करणार ते आधी स्पष्ट करा. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे हे प्रकल्प रखडले असून, पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष घालण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक प्रकल्पांचे काम रखडले आहे. डोंबिवलीतील मोठागाव, ठाकूर्ली, माणकोली पूलाचे काम, कल्याण शिळ रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटिकरणाचे काम, रिंग रोडचे काम, ऐरोली-काटई भुयारी मार्गाचे काम, कल्याण-तळोजा मेट्रोचे काम, कल्याण-ठाणे मेट्रोचे काम आणि केडीएमसीमधील रखडलेल्या रस्त्यांची कामे आदी ११ प्रकल्प रखडले आहेत. हे काम कधी पूर्ण होणार? यातील रिंग रोडचे काम संथगतीने सुरू आहे. आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याने या प्रकल्पांच्या कामाला तिप्पट खर्च येणार आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लवकर लक्ष द्यावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button