‘हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार’? काँग्रेस नेत्याची जहरी टीका

Sanjay nirupam

मुंबई : मुंबई शहरातील कराची स्वीट्स दुकानाचं नाव बदलण्याची मागणी शिवसेनेच्या नितीन नांदगावकर यांनी केली आहे. कराची स्वीट्स या नावामुळे देशातील सैनिकांचा अपमान होतो असं नितीन नांदगावकर यांचे म्हणणं होतं, त्यासाठी नांदगावकर यांनी कराची स्वीट्सच्या दुकानात जाऊन तेथील मालकांना याबाबत समज दिली होती, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्या घटनेवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

यात काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ट्विट करत खोचक टीका केली. भारतात चायनीज हॉटेलचा चीनशी काही देणंघेणं नाही, तसेच वांद्रे येथील कराची स्वीट्सचं पाकिस्तानशी कोणतंही नातं नाही. हे सत्य शिवसेनेच्या मुर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार? ७० वर्ष जुन्या दुकानाचं नाव बदलण्याची धमकी दिली जाते, हे चुकीचं आहे. मुख्यमंत्र्यांनी तमाशा बघू नये, त्यांची रक्षा करावी असं म्हटलं.

तर कराची नाव बदला ही भूमिका शिवसेनेची नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले. कराची बेकरी आणि कराची स्वीट्स या ६० वर्षांपासून मुंबईत आहेत. त्यांचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानाचे नाव बदलण्याची मागणी करण्यात अर्थ नाही असं त्यांनी ट्विट करत सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER