प्रामाणिक शेतकऱ्यांचे २५ कोटी कधी मिळणार ? भाजपचा सवाल

Samarjit Singh Ghatge

कोल्हापूर :- राज्यात ४४ लाख ७० हजार शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज भरणारे आहेत, त्यांची रक्कम अंदाजे २५ हजार कोटी होते. मात्र, अद्याप याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारची पुढील कार्यवाही झालेली नाही. आता तर सरकारकडून याबाबत कोणत्याही प्रकारचे वक्तव्यसुद्धा केले जात नाही. त्यामुळे हे पैसे कधी मिळणार? अशी विचारणा  भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी केली.

प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय शासनामार्फत होतो की काय, अशी भीती व्यक्त होत आहे . त्यामुळे शासनाने जाहीर केलेली ही अनुदानाची रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून त्यांना न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी करून प्रश्नासाठी लवकरच मोठे आंदोलन उभे करणार असल्याची घोषणा शिवार-संवाद यात्रेत घाटगे यांनी केली.

प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनात्मक अनुदान जाहीर केले होते; मात्र त्याला एक वर्ष उलटत आले तरी याची रक्कम शेतकऱ्यांना मिळलेली नाही. हे अनुदान तातडीने जमा करावे, अन्यथा कोल्हापुरातून (Kolhapur) मोठे आंदोलन उभे करून शेतकऱ्यांपुढे राज्य सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यंदाची दिवाळी गोड करू, असे आश्वासन दिले; मात्र यंदाची दिवाळी गोड झाली नाही. पुढच्या दिवाळीची ते वाट पाहात आहेत का? असा सवाल घाटगे यांनी करत महावितरण वीज बिलाची वसुली थांबवावी, अन्यथा राज्यभरात उद्रेक होईल, असा इशारा दिला.

ही बातमी पण वाचा : शेतकर्‍यांना ज्या दिवशी ‘हा’ कायदा कळेल, सारा देश पेटून उठेल – राहुल गांधी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER