घुसखोरांना कधी हाकलणार ? मनसेने ठाकरे सरकारला विचारले

raj Thackeray & Uddhav Thackeray

मुंबई :- बांगलादेशी घुसखोरांना बोगस आधारकार्ड आणि पासपोर्ट बनवून देण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या दलालांना मुंबई पोलिसांनी अटक केली. स्थानिक पातळीवरची कागदपत्रे बनवण्यासाठी एमआयएमच्या दोन आमदारांच्या लेटरहेडचा वापर करण्यात आला आहे. यानंतर मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ठाकरे सरकारला प्रश्न विचारला आहे- बांग्लादेशी घुसखोरांना कधी हाकलणार?

मनसेने म्हटले आहे, महाराष्ट्रात बांग्लादेशियांचे अड्डे-मोहल्ले उभे राहत आहेत ते भविष्यात त्रासदायक ठरणार आहेत हे राजसाहेब वारंवार सांगत आहेत. त्यासाठी आम्ही मुंबईत महामोर्चाही काढला होता. आता ह्या घुसखोरीला धर्मांधतेसह, राजकीय पाठबळही लाभते आहे ! महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हाकलणार ?’मनसेनं यापूर्वीही बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध पक्षाची भूमिका मांडताना एनआरसी कायद्याचे समर्थन केले होते.

मनसेचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला(सीएए) विरोधच आहे, मात्र बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना हाकलणार्‍या नागरिकत्व नोंदणी कायद्याला (एनआरसी) पाठिंबा आहे. आगामी ९ फेब्रुवारी रोजी होणारा मनसेचा मोर्चा हा बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशातून हाकलून लावण्याच्या मागणीसाठी असेल, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thyackeray) यांनी मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या बैठकीत मंगळवारी सांगितले आहे.

मनसे कार्यकर्ते घुसखोरांच्या मुद्द्यावर यापूर्वीही आक्रमक झाले होते. विविध माध्यमातून ते आपला रोष घुसखोरांच्या विरोधात व्यक्त करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे महामेळाव्यात पाकिस्तानी-बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध कडक भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मनसेच्या नेत्यांनीदेखील स्थानिक पातळीवर आक्रमक होत जोरदार विरोध केला. मुंबई उपनगर आणि पनवेल परिसरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बांग्लादेशी घुसखोऱ्यांना देशातून निघून जाण्याचा इशारा दिला आहे.

घुसखोरांना इशारा देणारा केक कापला

मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या उपस्थितीत कृष्णकुंज इथे मनसे वर्सोवा शाखाध्यक्ष प्रशांत राणे यांनी पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांनो चालते व्हा, असा लिहिलेला केक कापला होता. प्रशांत राणे यांनी स्वतःच्या वाढदिवसानिम्मित हा केक बनवला होता. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत तो कापण्यात आला होता.

ही बातमी पण वाचा : अकरावीचा प्रश्न उद्यापर्यंत सुटणार? वर्षा गायकवाड यांच राज ठाकरेंना आश्वासन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER