वेळ येईल तेव्हा व्यापाऱ्यांना त्यांची जागा दाखवू; राष्ट्रवादीची धमकी

- 'भारत बंद'मध्ये भाग घेतला नाही म्हणून संताप

Pune Bharat Bandh Andolan

पुणे : शेतकऱ्यांच्या समर्थनात आजच्या  (८ डिसेंबर)  भारत बंदमध्ये व्यापारी संघटनांनी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते; मात्र पुण्यातील व्यापारी संघटनांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचे नाकारले. यामुळे संतापलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी व्यापाऱ्यांना धमकी दिली, व्यापाऱ्यांवर वेळ येईल तेव्हा महाविकास आघाडी सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. (Ankush Kakade on Pune Bharat Bandh Andolan) अंकुश काकडे म्हणाले, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी याची नोंद घ्यावी की, त्यांच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा महाविकास आघाडी सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.

शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या प्रकल्पासाठी पाच हजार एकर जागा मिळवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र त्यांना त्या उपकारांची जाणीव नाही. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रक काढले होते – आम्ही दुकाने  उघडी ठेवू, पण तुमच्या मोर्चात सहभागी होऊ, यावरून अंकुश काकडे संतापले आहेत. काकडे म्हणाले, आम्हाला व्यापाऱ्यांच्या पाठिंब्याची गरज नाही.

तुमचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता तर चार तास दुकाने बंद ठेवायची होती. तुम्ही चार तासही दुकाने बंद ठेवू  शकत नाही? फत्तेचंद रांका यांनी याची नोंद घ्यावी. जेव्हा तुमच्यावर वेळ येईल, तेव्हा महाआघाडीचे सरकार तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. पुण्यातील व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. ट्रॅफिकची समस्या आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी बैठक घेतली होती.

त्यानंतर शहराच्या बाहेर पाच हजार एकरमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण व्यापाऱ्यांना या उपकारांची जाणीव नाही. मी सगळ्या व्यापाऱ्यांबद्दल बोलत नाही, व्यापाऱ्यांच्या नेत्यांबद्दल बोलतो आहे, असे काकडे म्हणालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER