जेव्हा शो स्टॉपर होता फरदीन खान आणि बॅकग्राउंड मॉडेल होती दीपिका पदुकोण; व्हायरल होत आहे १५ वर्षे जुना फोटो

Fardeen Khan and Deepika Padukone

बॉलिवूडचं बॉलिवूडचं (Bollywood news) जग खूप वेगळं आहे, कोण कधी स्टार बनणार आणि कोणाचे नशीब धोका देईल याची माहिती नाही. आज दीपिका पदुकोण (Deepika Padukone) ही इंडस्ट्रीमधील शीर्ष अभिनेत्रींपैकी एक आहे; पण एकेकाळी ती बॅकग्राउंड मॉडेल असायची. ‘ओम शांती ओम’ चित्रपटाद्वारे शाहरुख खानबरोबर अभिनेत्री म्हणून पदार्पण करणारी दीपिका आज एका चित्रपटासाठी करोडो रुपये फी घेते.

मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात करणार्‍या दीपिकाचा एक जुना फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बॅकग्राउंड मॉडेलच्या रूपात दिसत आहे. या शोची सर्वांत खास गोष्ट म्हणजे त्या वेळी शो स्टॉपर फरदीन खान होता. फरदीनचे त्यावेळी इंडस्ट्रीत मोठे नाव होते. त्याचे काही चित्रपट हिट झाले होते आणि अनेक चित्रपट प्रदर्शित होणार होते. अशा परिस्थितीत फरदीन शोमध्ये शो स्टॉपर बनला होता आणि त्या शोमध्ये दीपिकाला बॅकग्राऊंड मॉडेल म्हणून पाहिले गेले होते. आता हे जुने फोटो व्हायरल होत आहे.हे फोटो व्हायरल होण्याचे सर्वांत मोठे कारण म्हणजे आज त्याचा अर्थ बदलला आहे. आज दीपिका मोठी स्टार बनली आहे, तर फरदीन इंडस्ट्रीतून गायब झाला आहे. हे फोटो साधारण १५ वर्षे जुने आहे जेव्हा दीपिका नुकतीच एक मॉडेल आणि फरदीन मोठा स्टार होता.

एकीकडे मेहनत आणि दमदार अभिनयातून दीपिकाने स्वत:ला मोठी नायिका बनविले तर फरदीन चित्रपटांपासून दूर होत गेला.फरदीन खानचे फोटोदेखील काही दिवसांपूर्वी समोर आले होते, ज्यात त्याचे वजन खूप वाढलेले दिसून आले. यानंतर त्याला ट्रोलही केले गेले. तथापि, फरदीनने सांगितले की, मी आपल्या कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवत आहे. त्याच वेळी त्याचे काही असे फोटोदेखील समोर आले असून त्यात तो फिट दिसत होता.

त्याचे फोटो पाहून चाहत्यांनाही वाटायला लागले की, बहुदा फरदीन कमबॅक करणार आहे. दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर दीपिका आज बॉलिवूडची लीडिंग लेडी बनली आहे. ‘ओम शांती ओम’, ‘कॉकटेल’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘राम लीला’, ‘ये जवानी है दिवानी’ यासारख्या चित्रपटांसह दीपिकाने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा अधिक हिट चित्रपट केले आहेत. लवकरच दीपिका रणवीर सिंगसह ‘८३’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER