जेंव्हा मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश नव्हता, तेंव्हा ‘या’ महिलेनं फिजिक्समध्ये पी.एच.डी. केली !

Maharashtra Today

दुसऱ्या महायुद्धानंतर कलकत्ताच्या गल्लित उरलेली हत्यारं भंगाराच्या भावात विकले जात होते. एक मुलगी निवडून- निवडून काही पार्ट्स गोळा करत होती. कारण तिला फिजिक्समधल्या संशोधणासाठी एक्स-रे मशिन बनवायची होती. ज्याकाळात खुप कमी प्रमाणात मुली पदवीधर असायच्या त्यावेळी ही मुलगी फिजीक्समध्ये पी.एच.डी. (Ph.D. in physics)करत होती. पुढं त्यांनी बंगाली भाषेत विज्ञान विषयक पुस्तकं लिहली. विज्ञानाचा प्रचार प्रसार केला. त्यामुलीचं नाव होतं डॉ. पुर्णिमा सिन्हा.(Dr. Purnima Sinha,) ज्यांनी सत्येंद्रनाथ बोस यांच्या मार्गदर्शनात पी.एच.डी. पुर्ण केली.

१२ ऑक्टोबर १९२७साली कलकत्त्यातले प्रसिद्ध वकिल नरेशचंद्र सेनगुप्ता यांच्या घरी डॉ. सिन्हा यांचा जन्म झाला. स्त्री पुरुष समान हक्काची मागणी लाऊन धरणाऱ्या नरेशचंद्रांनी त्यांच्या तिन्ही मुलींना दर्जेदार शिक्षण दिलं. स्वतःच्या पायावर उभ राहण्याची संधी दिली. १९४५ साली डॉ. बोस यांनी कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक म्हणून शिकवायला सुरु केलं. प्रोफेसर बोस यांना पुर्णिमा सिन्हा यांच्यातली फिजिक्स विषयक आस्था दिसून आली. त्यांनी पुर्णिमा यांना १९५१मध्ये संशोधक टीममध्ये सामील करुन घेतलं.

वर्ष १९५५मध्ये त्यांनी ‘एक्स-रे अँड डिफरेंशिअल थर्मलअॅनालिटिक्स ऑफ इंडियन क्लेज’ या शिर्षकाखाली त्यांनी स्वतःचा थिसीस जमा केला. एका वर्षानंतर त्याला पी.एच.डी.ची डिग्री मिळाली. त्यांनी स्वतः एक्स-रे मशिन बनवण्याचा शोध लावला. पुर्ण देशातील मातीचा अभ्यास त्यांनी केला. पी.एच.डी.नंतर त्यांना स्टॅन्फोर्ड विद्यापीठात बायोफिजीक्स विषयात संशोधन करण्याची संधी मिळाली. तिथून परत्यानंतर ‘जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’मध्ये त्यांनी काम केलं.

त्यांचे गुरु प्रोफेसर बोस यांच्या पावलावर पाउल ठेवत सामान्यांच्या बांगली भाषेत विज्ञान पोहचवण्यासाठी त्या लिहित राहिल्या. प्रोफेसर बोस यांनी सुरु केलेल्या ‘बंगिया विज्ञान’ परिषदेशी त्यांनी स्वतःला जोडून घेतलं. ‘इर्विन श्रोडिंगर’ यांच पुस्तक ‘माइंड अँड मॅटर’ इंग्रजीतून बंगाली भाषेत भाषांतरीत केलं. पर्णिमा सिन्हा यांच व्यक्तीमत्तव विज्ञानाहून मोठं होतं. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगित, चित्रकला आणि तबला वादनात महारथ मिळवली. १९७०मध्ये त्यांनी भारतीय संगितावर ‘अॅन अप्रोच टु द स्टडी ऑफ इंडीयन म्युजिक’ हे पुस्तक लिहलं. याशिवाय त्यांनी ‘द जर्नल ऑफ एशियाटीक सोसायटी’च्या माध्यमातून ‘जारवा सॉंग्ज अँड वैदिक चांट- अ कम्पिरिजन ऑफ मेलोडिक पॅटर्न’सारखे लेख लिहीत भारतीय संगित परंपेरवर त्यांनी प्रकाश टाकला.

त्यांचे पती सुरजित सिन्हा यांच्या सोबत मिळून त्यांनी शांतीनिकेतनच्या आदिवासी मुलांसाठी शाळा सुरु केली. जिथं त्यांनी फिजिक्स आणि संगित दोन्ही कोर्स सुरु केले. इथं त्यांनी कुंभार समाजासोबतही काम केलं. त्यांना डॉ. सुकन्या सिन्हा आणि डॉ. सुपर्णा सिन्हा या दोन मुली होत्या. त्यांच्या दोन्ही मुलींनी देशाच्या उच्च विज्ञानसंस्थानिकांसोबत काम केलं. वर्ष २०१५ मध्ये ११ जुलैला त्यांनी शेवटचा श्वास घेतला. फिजिक्स रिसर्चमध्ये त्यांच्या योगदानामुळं भारतात विज्ञान प्रसाराची मोठी चळवळ निर्माण झाली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button