ईडीची तारीख आली की, खडसेंना हमखास कोरोना होतो; गिरीश महाजनांचा टोला

Eknath Khadse - Girish Mahajan

जळगाव :- ईडीकडून (ED) मिळालेल्या चौकशीची तारीख जवळ आली की, राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हमखास कोरोना (Corona) होतो, असा खोचक टोला भाजप (BJP) नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी खडसेंचा चांगलाच समाचार घेतला.

मागील काही दिवासांपासून खडसेंच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. तसेच आतापर्यंत खडसे यांना तीन वेळा कोरोनाची आणि कोरोनासदृश लक्षणे दिसून आली आहेत. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ घेऊन महाजन यांनी खडसेंची कोंडी केली. जेव्हा जेव्हा ईडीकडून चौकशीची तारीख येते तेव्हा तेव्हा खडसे यांना कोरोनाची लागण होते, असं म्हणत महाजन यांनी खडसेंना कोंडीत पकडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button