न्यायालयाने जेव्हा देव आनंदला काळा कोट घालण्यास मनाई केली होती

Dev Anand

देव आनंदने (Dev Anand0 चॉकलेट हीरो म्हणून आपली ओळख निर्माण केली होती. त्याच्या महिला प्रशंसकांची संख्या अपार होती. त्याची प्रत्येक अदा त्याच्य) महिला प्रशंसक डोळ्यात साठवून ठेवत असत. गोरा पान देव आनंद पांढरा शर्ट (White Shirt) आणि त्यावर काळा कोट ( Wear black coat) घातल्यावर प्रचंड सुंदर दिसत असे. देव आनंदला ही गोष्ट माहित असल्याने तो जास्तीत जास्त वेळ काळा कोट घालून पडद्यावर येत असे.

परंतु त्याचा हा पेहराव न्यायालयाच्या नजरेत आला आणि त्यांनी देव आनंदला काळा कोट घालण्यास मनाई केली. काळा कोट घातल्याने वकिलांची बदनामी वगैरे असा काही विषय नव्हता. तर याचे कारण फार मनोरंजक आहे. अस सांगतात की देव आनंदला अशा काळ्या कोटात पाहून आत्यंतिक आवेग, किंवा आनंदाने काही मुलींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्या

मुळे स्वतः न्यायालयानेच याची दखल घेऊन देव आनंद यांनी काळा कोट घालू नये असा आदेश दिला होता. देव आनंदनेही न्यायालयाच्या या आदेशाचे काही काळ पालन केले होते. एखाद्या नायकाच्या पेहरावाचा परिणाम आणि त्यात न्यायलयाने हस्तक्षेप करण्याची कदाचित ही बॉलिवुडच्या इतिहासातील एकमेव घटना असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER