मा मुख्यमंत्री हे मा राज्यपालांना भेटून आल्यावर राजभवनावर माध्यमांशी बोलले, त्यातील अंश

Uddhav Thackeray - governor bhagat singh koshyari - Maharashtra Today

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणसंदर्भात दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने आता केंद्र सरकारने यात लक्ष घालून लवकरात लवकर पाऊले उचलावीत अशी विनंती राष्ट्रपतींना करणारे पत्र राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना दिले लवकरच आम्ही मा पंतप्रधानांची वेळ घेऊन त्यांना या प्रश्नी भेटणार आहोत .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आम्ही सर्वांनी समाजाच्या भावना लक्षात घेता केंद्राला याबाबत विनंती करायचे ठरविले आणि त्यानुसार आज राज्यपालांना भेटून पहिले पाऊल टाकले आहे.

मराठा समाजाने नेहमीच समजूतदारपणा दाखवला आहे. आरक्षण प्रश्नी सरकार सोबत आहे याची समाजाला कल्पना आहे, ते सरकारच्या विरोधात नाहीत, त्यामुळे मी पूर्वी देखील मराठा समाजाला धन्यवाद दिले आहेत आणि आता आपल्या माध्यमातून परत धन्यवाद देतो.

मराठा आरक्षणाचा कायदा विधिमंडळात सर्व पक्षांनी एकमुखाने संमत केला आहे, जनतेच्या भावनांचा आदर ठेवून हा निर्णय झाला, तो न्यायालयात टिकला नसला तरी सरकार म्हणून आम्ही सर्व या समाजाच्या भावनांशी सहमत आहोत.

न्यायालयाने याबाबतीत केंद्राला अधिकार आहेत असं सांगितले आहे, त्या अनुषंगाने आज आम्ही राज्यपाल महोदय याना भेटलो राज्यपालांनी देखील आमचे म्हणणे व्यवस्थित ऐकून घेतले असून ते केंद्राला आमच्या भावना कळवतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button