जेव्हा या अभिनेत्रींनी लाल रंगाच्या साडीत केला कहर, तेव्हा रेखासमोर सर्वेच राहिले फिके

बॉलिवूड अभिनेत्रींचा साडी लुक नेहमीच चर्चेत असतो. मग तो उत्सवाचा कार्यक्रम असो वा एखादा विशेष कार्यक्रम असो, अभिनेत्री साड्यांना प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत जर ती लाल रंगाच्या साडीची असेल तर ती तिच्या सौंदर्याने लोकांना वेड लावते. तर चला मग बघूया बॉलिवूड अभिनेत्रींचा फोटोज जेव्हा त्यांनी लाल रंगाच्या साड्या परिधान केल्या.

या फोटोत दीपिका साडीसह जड ज्वेलरीमध्ये दिसत आहे. दीपिकाचा लूक तिच्या पद्मावत चित्रपटाची आठवण करून देणारा आहे.

रेखा त्यांच्या कांजीवाराम साड्यांसाठी ओळखले जातात. त्या बर्‍याचदा गोल्डन किंवा ऑफ व्हाईट साड्यांमध्ये दिसतात. मात्र, त्यांचा लूक वेगळा असतो. रेखा यांचे सौंदर्य लाल रंगाच्या साडीत अजून उठून दिसते. त्यांना पाहिल्यावर असे दिसते की जणू त्यांच्यासाठी वृद्धत्व थांबले आहे.

शिल्पा शेट्टी बहुतेक सणासुदीच्या वेळी साडी नेसते. हि साडी तिने मागील वर्षी करवाचौथच्या कार्यक्रमात परिधान केले होते. शिल्पा शेट्टी बद्दल असं मानलं जातं की ती साडी वेगवेगळ्या प्रकारे परिधान असते, तितके कोणीही करत नाही. शिल्पा वेस्टर्न किंवा इंडियन दोन्ही लूकमध्ये सुंदर दिसते.

दिवाळीनिमित्त जान्हवी कपूरने हे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये ती रेड कलरच्या साडीत दिसत आहे. यासह तिने वर्क केलेला स्लीव्हलेस ब्लाउज घातला आहे आणि तिने तिचे केस उघडे ठेवले आहेत. तिचा साधा लुक हलक्या मेक-अपमुळे सर्वांचा आवडता झाला आहे.

कृती सॅनॉनचा ग्लॅमरस अवतार साडीमध्ये दिसला. यासह तिने स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केले आहे. हातात आणि कानातील दागदागिन्यांमुळे हा लुक पूर्ण होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER