काँग्रेसवर असे आरोप झाले तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा राजीनामे दिलेत : पटोलेंचा शिवसेनेला टोमणा

Shivsena & nana Patole

मुंबई : पूजा चव्हाण (Pooja Chauhan) आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेक्षाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेनेला (Shivsena) टोमणा मारला, काँग्रेसच्या मंत्र्यांवर असे आरोप झाले तेव्हा मंत्रीच काय, मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत, तेही चौकशी पूर्ण होण्याआधी!

राजीनामा देतो पण..

राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर तो स्वीकारा अशी विनंती संजय राठोड यांनी केली होती. मंत्रिपद टिकावे म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER