मनोरंजक कथा! जेव्हा ‘भुताला’ घाबरलेल्या सौरव गांगुलीला रॉबिन सिंगच्या खोलीत जायला भाग पाडले जाते!

जेव्हा ही घटना तिसऱ्यांदा घडली तेव्हा गांगुली घाबरला आणि थेट रॉबिन सिंगच्या खोलीत पळाला. भारतीय कर्णधार म्हणून गांगुलीला अशी काही घटना स्वीकार नाही करून घ्यायचे कि त्यांच्या बरोबर असे काही घडले होते.

Sourav Ganguly

भुतांची कथा कित्येक काळापासून आपल्याला आकर्षित करत आहेत. क्रिकेटपटूदेखील अशा काही धोकादायक अनुभवातून गेले आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीपासून ते महेंद्रसिंग धोणीपर्यंत सगळ्यांना हा अनुभव आहे. २००२ मध्ये भारतीय संघाच्या इंग्लंड दौर्‍यादरम्यान सौरव गांगुलीला अश्या एका घटनेचा सामोरे जावे लागले. त्या काळात टीम इंडिया डरहममधील लुमली कैसल हॉटेलमध्ये थांबली होती. त्या हॉटेलमध्ये गांगुलीने एका रात्री त्याच्या बाथरूममध्ये नळ सुरू असल्याचे आवाज ऐकले, परंतु जेव्हा तो उठला आणि तेथे पहायला गेला, तेव्हा नळ बंद होते.

अर्ध्या तासानंतर पुन्हा तीच घटना घडली. जेव्हा ही घटना तिसऱ्यांदा घडली तेव्हा गांगुली घाबरला आणि थेट रॉबिन सिंगच्या खोलीत पळाला. भारतीय कर्णधार म्हणून गांगुलीला अशी काही घटना स्वीकार नाही करून घ्यायचे कि त्यांच्या बरोबर असे काही घडले होते. त्याने रॉबिन सिंगला सांगितले की खोलीचे हीटर काम करत नाही.

इयान बोथमच्या आत्मचरित्रात Beefy’s Cricket Tales मध्ये या संपूर्ण घटनेचा उल्लेख आहे. हा किस्सा आठवत गांगुली म्हणाले, “जेव्हा मी नळ सुरू असल्याचा आवाज ऐकला तेव्हा मी उठलो आणि नळ बंद करण्यास गेलो. नळ आधी पासनच बंद होते. मला वाटले की कदाचित स्वप्न आहे किंवा दुसर्‍या खोलीतून नळ सुरू असल्याचा आवाज आला असेल. मी परत गेलो आणि झोपलो.”

ते पुढे म्हणाले: “जेव्हा मी तिसऱ्यांदा नळाचा आवाज ऐकला, तेव्हा मी पलंगावरुन उडी मारून बाहेर पळत सुटलो. मी घाबरुन गेलो आणि रॉबिनसिंगच्या खोलीत गेलो. दार ढकलले आणि त्याला विचारले की मी त्याच्या खोलीत राहू शकतो का?” मी कर्णधार होतो, म्हणून मी त्याला नव्हतो सांगू शकत की मी घाबरलेलो आहो आणि भूतांबद्दल विचार करत आहो. मी काय करू शकत होतो ? मग मी त्याला सांगितले की माझ्या खोलीची हीटर काम करत नाही आहे, म्हणूनच आपण मला आज रात्री आपल्या खोलीत राहू द्या, जे रॉबिनने न डगमगता स्वीकारले.”

महेंद्रसिंग धोनी, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स यांनीही अशा घटनेचा सामना केला आहे

लंडनमधील लैंघम होटल हे दुसरे हॉटेल आहे जिथे क्रिकेटर्सने असामान्य गोष्टी अनुभवल्या आहेत. २०१४ मध्ये, स्टुअर्ट ब्रॉडने असा दावा केला की शौचालयाची नळ आपोआप चालू होतात. या खोलीत राहत असताना बेन स्टोक्सलाही झोपायला त्रास झाला. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यांनीही हॉटेलच्या आत एक गूढ सावली पाहिल्याचा दावा केला आहे.

ही बातमी पण वाचा : जेव्हा सब्बीर रहमान एमएस धोनीला म्हणाला,”आज नाही”; जाणून घ्या काय होता…

या घटनेचा संदर्भ देत ब्रॉडने एका मुलाखतीत सांगितले “मी तुम्हाला सांगत आहे, काहीतरी विचित्र होत आहे”. ब्रॉड म्हणाला, “सध्याच्या कसोटी सामन्यात [भारतविरुद्ध] मी ठीक नव्हते कारण मला हॉटेलच्या खोलीत एक अदृश्य व्यक्तीचा आभास झाला.”

“एका रात्री मध्यरात्री 1.30 च्या सुमारास मी उठलो आणि मला खात्री झाली होती की कोणीतरी खोलीत उपस्थित आहे. माझ्या आयुष्यातील ही विचित्र भावना होती.”


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER