फलंदाजीत अपयशी झाला; पण सौरवने गोलंदाजीने दाखवली पाकिस्तानला ‘दादागिरी’

Saurav Ganguly

आजच्या दिवशी सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) एकदिवसीय सामन्यात घेतले होते पाच बळी. टोरंटोमध्ये पाकिस्तानला ३४ धावांनी पराभूत केले होते. १९९० च्या दशकात टीम इंडियाची प्रतिमा ‘घरात शेर आणि बाहेर कोकरू’ अशी होती. प्रत्यक्षात हा संघ घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करत होता; परंतु परदेशात खेळताना वेगवान गोलंदाज-फलंदाजांसमोर शस्त्र टाकून देत होता. भारतीय संघाला या प्रतिमेतून बाहेर काढण्यात ‘दादा’ सौरव गांगुलीचे मोलाचे योगदान आहे.आजपासून ठीक २३ वर्षांपूर्वी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताला बॅटच्या मदतीने नव्हे तर स्वतःच्या गोलंदाजीच्या बळावर जिंकवले होते. १९९७ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात टोरोंटो येथे पाच सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. मालिकेचा तिसरा सामना १८ सप्टेंबर रोजी खेळला गेला होता.

सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली आणि फक्त १८२ धावाच करता आल्या. अशा परिस्थितीत पाकिस्तानला हे लक्ष्य साध्य करणे कठीण नव्हते. लक्ष्याचा पाठलाग केल्यानंतर पाकिस्तानच्या संघाने १८ षटकांत ३ गडी गमावून १०३ धावा केल्या आणि येथून पाकिस्तानला त्यांचा विजय स्पष्ट दिसला. त्यानंतर जे घडले तो इतिहास बनला. कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने गांगुलीला पार्ट टाइम गोलंदाज समजून चेंडू दिला; पण ‘दादा’ने हा सामना फिरवला. त्याने १० षटकांत केवळ १६ धावा देऊन ५ बळी घेतले. या सामन्यात भारताने ३४ धावांनी विजय मिळवला. यासह मालिकेमध्ये भारताजवळ अनिर्णीत ३-० अशी आघाडी होती.

तुम्हाला सांगूया की यानंतर गांगुलीने कानपूर एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध ११ डिसेंबर २००० रोजी ५ विकेट्स घेतल्या. त्या सामन्यात गांगुलीने १० षटकांत ३४ धावा दिल्या आणि ५ बळी घेण्याचा पराक्रम दाखवला. या मालिकेत त्याच्या नावाचा असा विक्रम आहे की, कोणताही खेळाडू २३ वर्षांत तो मोडू शकला नाही. पाकिस्तानविरुद्धच्या या मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली आणि सलग चौथा ‘सामनावीर’ बनण्याचा जागतिक विक्रम नोंदविला. भारताचा महान कर्णधार म्हणून ओळखल्या जाणार्‍या गांगुलीने आपल्या कारकीर्दीत १६ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय शतके ठोकली आहेत. त्या काळात, गांगुली आणि सचिनची जोडी वनडेमधील सर्वांत विश्वासार्ह सलामीची
जोडी मानली जात होती. गांगुलीला फलंदाज आणि कर्णधार म्हणून ओळखले जाते; परंतु त्याने आपल्या कारकीर्दीत १३२ आंतरराष्ट्रीय विकेट्स घेतल्या आहेत. टेस्टमध्ये त्याचे ३२ बळी आहेत, तर वनडेमध्ये १०० बळी आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER