जेव्हा मेलबर्न टेस्टमध्ये शुभमन गिल हा रविचंद्रन अश्विनला म्हणाला की, ‘ऐश भाई ! जल्दी खत्म कर दो यार’

Ravichandran Ashwin and Shubhaman Gill

शुभमन गिलने बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेत आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात केली. संपूर्ण मालिकेत त्याने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) देखील या युवा फलंदाजाचा चाहता आहे.

टीम इंडियाचा ज्येष्ठ फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने या गोष्टीचा खुलासा केला आहे की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेल्या मेलबर्न कसोटी सामन्यात पदार्पण करणाऱ्या शुभमन गिलची (Shubhaman Gill) मानसिकता कशी होती.

अश्विन-गिल यांच्यात मजेदार चर्चा
रविचंद्रन अश्विनने एका मजेदार वाक्याचा उल्लेख केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान अश्विनने कॅमेरून ग्रीनची विकेट घेतली. त्यानंतर शुभमन गिल म्हणाला, ‘ऐश भाई, जल्दी खत्म कर दो यार. ४०-५० रन होगा तो मैं ५ ओवर में खत्म कर दूंगा.’

गिलचा चाहता आहे अश्विन
रविचंद्रन अश्विनने आपल्या यू-ट्यूब वाहिनीवर सांगितले की, तो शुभमन गिलच्या फलंदाजीचा चाहता आहे. जेव्हा गिलने त्याला मेलबर्नमध्ये लवकर विकेट मिळवण्यास सांगितले तेव्हा अश्विनने विचार केला, ‘वाह ! हा किती अद्भुत व्यक्ती आहे.’

अश्विनची कमाल
रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांत एकूण १२ बळी घेतले होते. या कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथ तीन वेळा अश्विनचा बळी ठरला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER