
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, रुग्णालयातही ते वर्तमानपत्र वाचत बसले आहे. त्यांचा पेपर वाचतानाचा फोटो काल खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केला. पेपरमध्ये छापून आलेला फोटो पवार न्याहाळून पाहत असल्याचे फोटोत दिसत (photo of himself from the hospital) आहे.
आज सकाळी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून समर्थकांची शरद पवार यांच्याशी भेट घडवून दिली. या व्हिडीओतही शरद पवार रुग्णालयात बेडवर बसून पेपर वाचताना दिसत आहेत. यात पवार स्वतःचा फोटो पाहत असताना ‘योगायोगाने हाच फोटो लावलाय’ असे सुळे म्हणतात. ‘एकदा गुड मॉर्निंग म्हणता का? सगळे बघतायत तुमच्याकडे’ अशी विचारणाही सुप्रिया सुळे यांनी केली. तेव्हा पवारांनी सर्वांना स्माईल दिले.
“सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय
साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत.” असे सुप्रिया सुळे ट्विट करत म्हणाल्या.
शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, त्यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय डॉक्टरांनी घेतलेला नाही. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे त्यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. पवारांना थोडी कावीळही झाली होती. तीदेखील कमी होईल, असे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. पवारांची प्रकृती कशाप्रकारे सुधारेल यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल.
सुप्रभात, ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार. ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय @PawarSpeaks साहेब त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत आहेत. pic.twitter.com/ERf0Gl35Tp
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला