जेव्हा शाहरुखला पोलिसांनी पकडले होते

Shahrukh Khan

शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या दोन वर्षांपासून रुपेरी पडद्यावर दिसला नसला तरी सोशल मीडियावर तो चांगलाच ॲक्टिव्ह असतो आणि आपल्या प्रशंसकांच्या प्रश्नांना उत्तरेही देतो. नुकतेच त्याने तीन चित्रपटांच्या कामांना सुरुवातही केली आहे. 2021 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले असेल असे तो स्वतःच म्हणत आहे. परंतु त्याचे मागील चित्रपट पाहाता त्याच्या या दाव्यात किती तथ्य आहे हे ते चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समजेल.

तर अशा या किंग खानला पोलिसांनी एका प्रकरणात अटक केली होती आणि त्याला एक दिवस तुरुंगातही घालवावा लागला होता. आता तुम्ही म्हणाल, हे कसे शक्य आहे. शाहरुख खानला बॉलिवूडमध्ये (Bollywood) किंग खान म्हटले जाते आणि संपूर्ण जगभरात त्याचे फॅन्स पसरलेले आहेत. असे असताना शाहरुखला पोलीस कसे काय अरेस्ट करतील आणि असा त्याने काय गुन्हा केला होता असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच उद्भवला असेल. तर स्वतः शाहरुख खाननेच ही माहिती दिली होती.

काही दिवसांपूर्वी शाहरुख ‘माय नेक्स्ट गेस्ट नीड्स नो इंट्रोडक्शन विद डेविड लेटरमॅन’ शोमध्ये पाहुणा म्हणून गेला होता. या मुलाखतीत त्याने आपल्या जीवनातील अनेक घटना सांगितल्या होत्या. त्यातच तुरुंगवारीची घटनाही त्याने सांगितली होती. 1993 च्या आसपास एका मासिकात एक लेख छापून आला होता. त्या लेखामुळे शाहरुख प्रचंड नाराज झाला होता आणि रागारागाने त्याने मासिकाच्या संपादकाला फोन केला. तेव्हा संपादकाने ती गमतीची गोष्ट आहे असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण शाहरुखचा राग शांत झाला नाही. तो रागातच त्या मासिकाच्या ऑफिसमध्ये पोहोचला आणि त्याने संपादकाला शिवीगाळ केली, तसेच लेख लिहिणाऱ्याला ठार मारण्याची धमकीही दिली आणि तो निघून गेला.

दुसऱ्या दिवशी त्याच्या सेटवर पोलीस आले आणि त्याला सोबत येण्यास सांगू लागले. शाहरुखला वाटले ते त्याचे फॅन आहेत आणि फोटो काढण्यासाठी घेऊन जात आहेत असे त्याला वाटले. तो त्यांच्यासोबत गेला तर त्यांनी त्याला जीपमध्ये बसवले आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तेथे नेऊन त्याला तुरंगात डांबले. संपादकाच्या मालकाने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी शाहरुखला अरेस्ट केले होते. शाहरुख म्हणतो, तेव्हा मी पहिल्यांदा तुरुंग पाहिले. अत्यंत छोटी जागा होती आणि घाणही होते. तेथे मलमूत्रही पसरलेले होते. एक दिवस मी तुरुंगात राहिलो. त्यानंतर मला जामिन मिळाला आणि मी बाहेर आलो. बाहेर आल्यावर मी सर्वप्रथमच त्या मासिकाच्या संपादकाच्याच घरी गेलो असेही शाहरुखने सांगितले.

ही बातमी पण वाचा : शाहरुख खान बॉबी देओलला घेऊन तयार करणार ‘लव्ह हॉस्टेल’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER