जेव्हा शाहरुख खान म्हणाला होता- अबराम आणि आराध्या बच्चन माझी आणि काजोलच्या जोडीला करू शकतात रिप्लेस

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खान आणि काजोलची ऑनस्क्रीन जोडी बर्‍यापैकी हिट ठरली आहे. दोघांनाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं आहे. शाहरुख आणि काजोलच्या ऑनस्क्रीन जोडीने चाहत्यांना प्रेमाचा खरा अर्थ सांगितला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. दोघांनीही अनेक हिट चित्रपट एकत्र दिले आहेत. आता शाहरुख खानला वाटतंय की कोणती जोडी त्याच्या आणि काजोलच्या जोडीची जागा घेऊ शकते तर ती म्हणजे आराध्या बच्चन आणि मुलगा अबराम खान.

काही दिवसांपूर्वी शाहरुखला मुलाखतीत त्याच्या आणि काजोलची हिट जोडीला रणबीर कपूर-दीपिका पादुकोण, रणवीर सिंग-दीपिका पादुकोण, आलिया भट्ट-सिद्धार्थ मल्होत्रा आणि फवाद खान-सोनम कपूर यांच्यापैकी कोणती जोडी तुम्हाला रिप्लेस करू शकते.. शाहरुख खान उत्तर देत म्हणाला की, माझा मुलगा अब्राम आणि अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हे या जोडीचे रिप्लेसमेन्ट आहे. अब्राम आराध्यापेक्षा लहान आहे, असे काजोलने उत्तर दिले होते. शाहरुख म्हणाला की प्रेमात वय पाहिले जात नाही.

अमिताभ बच्चन यांना जेव्हा हे समजले तेव्हा ते म्हणाले की शाहरुखच्या तोंडात खूप तूप साखर आणि दुधाची मलाई. असं म्हणतात की शाहरुख खान अमिताभ बच्चन यांना आपला पिता मानतो. जेव्हा अबरामला हे कळले तेव्हा त्याला खात्री नव्हती. अमिताभ बच्चन यांनी आराध्या आणि अबरामचा फोटो शेअर करुन हा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांनी लिहिले, “शाहरुख खानचा धाकटा अबराम विचार करतो आणि असा विश्वास ठेवतो की मी शाहरुख खानचा पिता आहे. तसेच, शाहरुखच्या घरात मी त्याच्याबरोबर राहत नाही याचादेखील त्याला आश्चर्य आहे. “

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर कमेंट करताना शाहरुख खानने लिहिले की, “सर आया करो ना, शनिवारी अब्रामबरोबर घरी राहण्याची संधी मिळेल. त्याच्या आयपॅडवर खूप मजेदार गेम्स आहेत, ते आपण एकत्र मिळून खेळू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER