जेव्हा संजय खानने या अभिनेत्रीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले होते

When Sanjay Khan had beaten the actress

बॉलिवुडमध्ये (Bollywood) दोन कलाकारांच्या मारामारीचे किस्से नवे नाहीत. अनेक कलाकारांनी एकमेकांचे गळे पकडलेले आहेत तर अनेकदा विवाहबाह्य संबंधांमुळेही अनेकांना मार खावा लागला आहे. अशाच एका प्रकरणामुळे एका प्रख्यात गायिकेला भर रस्त्यात एका संगीतकाराच्या बायकोने मारल्याची घटना तर जगविख्यात आहे. संजय खानने (Sanjay Khan) मात्र त्याच्या प्रेमात असलेल्या एका नायिकेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारले होते. आणि केवळ त्याच्यावर प्रेम करीत असल्यानेच या नायिकेने पोलिसांत तक्रार केली नव्हती असे सांगितले जाते.

संजय खान कोण असा प्रश्न कदाचित आजच्या तरुण पिढीला नक्कीच पडला असेल. तर संजय खान हा बॉलिवुडमधील एक यशस्वी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहे. काऊबॉय म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या फिरोज खानचा हा भाऊ. आणि आणखी एक ओळख म्हणजे हा ऋतिक रोशनचा सासरा आहे. संजय खानने 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या चेतन आनंद यांच्या ‘हकीकत’ सिनेमातून बॉलिवुडमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने राजश्री फिल्म्सच्या दोस्तीमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली होती. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. सिनेमा आणि टीव्ही अशा दोन्ही माध्यमात काम करणाऱ्या संजय खानला चार मुले आहेत. त्याच्या पत्नीचे नाव झरीन आहे.

संजय खानने अब्दुल्ला नावाचा एका सिनेमा तयार करण्यास घेतला होता. यात नायिका म्हणून झीनत अमानला घेण्यात आले होते. या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यानच या दोघांमध्ये इलू इलू सुरु झाले होते. या सिनेमातील मैंने पूछा चांद से हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. सिनेमाचे शूटिंग जवळ जवळ पूर्ण झाले होते. त्यामुळे झीनत अमानने दुसऱ्या निर्मात्याच्या सिनेमाचे लोणावळा येथे शूटिंग सुरु केले होते. त्याच दरम्यान संजय खानने झीनत अमानला फोन करून ताबडतोब मुंबईला येण्यास सांगितले. ‘अब्दुल्ला’च्या गाण्याचे काही शूटिंग बाकी असून ते पूर्ण करायचे आहे असे त्याने झीनता सांगितले. झीनतने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, ती आता शूटिंग करतेय आणि हे शूटिंग सोडून येऊ शकत नाही. तेव्हा संजय खानने त्या निर्मात्याशी तिचे संबंध असल्याचा आरोप केला. यामुळे झीनत खूप नाराज झाली.

संजय खानसोबत डेट्सबाबत चर्चा करण्यासाठी झीनत दुसऱ्या दिवशी थेट संजय खानच्या घरी पोहोचली. तेव्हा संजय खान ताज हॉटेलमध्ये पार्टी करीत असल्याचे तिला समजले. ती तिकडे गेली. संजय खानची पत्नीही तेथे उपस्थित होती. तेव्हा झीनताला पाहून संजय खानने, इकडे का आलीस असा प्रश्न तिला केला. आणि तिला एका रुममध्ये घेऊन गेला आणि त्यानंतर जे काही घडले त्याची झीनतने कल्पनाही केली नव्हती. संजय खानने झीनत अमानचे केस ओढत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तिला जमिनीवर ढकलून दिले आणि मारहाण करू लागला. तेवढ्यात त्याची पत्नीही तेथे आली. मात्र तिने दोघांच्या भांडणात पडण्याऐवजी मजा बघणे पसंत केले. रूममध्ये काय होत आहे हे सगळ्यांना समजले पण कोणीही झीनतच्या मदतीला धावले नव्हते. अखेर हॉटेलच्या स्टाफने झीनतची सुटका केली. मात्र झीनत तोपर्यंत खूप जखमी आणि रक्तबंबाळ झाली होती. या धक्क्यातून सावरायला झीनत अमानला थोडी थोडकी नव्हे तर 8 वर्षे लागली होती. या प्रकरणानंतरही झीनतचे संजयवरील प्रेम कमी झाले नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER