जेव्हा शाहरुखला मारण्यासाठी धावला होता संजय दत्त

Shahrukh Khan - Sanjay Dutt

संजय दत्तच्या (Sanjay Dutt) रागाने अनेक किस्से बॉलिवूडमध्ये (Bollywood) नेहमी सांगितले जातात. ड्रग्जच्या, दारुच्या नशेतील त्याचे किस्से तर भरपूर आहेत. मात्र असे असले तरी संजय दत्त बॉलिवूडमधील वरिष्ठ कलाकारांचा अत्यंत आदर करीत असे. त्यांचा कोणीही अपमान केलेला त्याला चालत नसे. त्यामुळेच शाहरुख खानने (Shahrukh Khan) एकदा एका ज्येष्ठ कलाकाराचा अपमान केला म्हणून संजय दत्त त्याला मारायला धावला होता. मात्र लोकांनी त्याला आवरल्याने शाहरुख संजय दत्तच्या मारापासून वाचला होता.

शाहरुख खान जेव्हा बॉलिवूडमध्ये संघर्ष करीत होता तेव्हाचा हा किस्सा आहे. शाहरुखचे काही चित्रपट हिट झाले होते आणि लोक त्या बऱ्यापैकी ओळखूही लागले होते. त्याच दरम्यान एका चित्रपट साप्ताहिकाने बॉलिवूडमधील कलाकारांविरोधात एक लेख छापला होता. त्या लेखाचा विरोध करून साप्ताहिकाच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय बॉलिवूडमधील कलाकारांनी घेतला होता. या मोर्च्याचे नेतृत्व अमजद खान करणार होते. खरे तर अमजद खान यांची तेव्हा प्रकृती चांगली नव्हती, तरीही ते कलाकारांसाठी मैदानात उतरले होते.

वांद्रे येथील मेहबूब स्टुडियोमध्ये सगळे कलाकार जमले होते. त्याचवेळेस तेथे शाहरुख खानही त्याच्या एका चित्रपटाचे शूटिंग करीत होता. मोर्चासाठी जमलेल्या कलाकारांसमोरून तो गेला आणि मोर्चाबद्दल माहिती असतानाही तो मोर्चात सामिल झाला नाही. एवढेच नव्हे तर त्याने अमजद खान यांना अभिवादनही केले नाही आणि तो पुढे गेला. तेव्हा संजय दत्तच्या रागाचा पारा चढला आणि तो शाहरुखच्या मागे त्याला मारण्यासाठी धावला. तो शाहरुखजवळ पोहोचला आणि त्याची मान धरणार तेवढ्यात मागून आलेल्या अन्य कलाकारांनी त्याला थांबवले आणि शाहरुखची मान त्याच्या हातात येऊ दिली नाही. जर शाहरुख संजय दत्तच्या तावडीत सापडला असता तर मात्र त्याचे काही खरे नव्हते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER