जेव्हा सलमानला गर्लफ्रेंडच्या घरी रंगे हाथ पकडले होते

Salman Khan

एक मुलगा त्याच्या प्रेयसीच्या घरी कोणी नसल्याने तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. दोघांच्या गप्पा सुरु असतानाच अचानक मुलीच्या घरचे येतात. तेव्हा मुलगा कपाटात लपतो. तर कधी कधी विवाहबाह्य संबंधातही असे घडते. चित्रपटांमध्ये अशी दृश्ये नेहमी दाखवली जातात. मग कपाटात लपलेल्या मुलाचे किंवा मुलीचे काय हाल होतात हेसुद्धा दाखवले जाते. परंतु चित्रपटातील ही घटना सलमान खानच्या (Salman Khan) बाबतीतही घडली आहे. ही काही थाप नाही तर स्वतः सलमाननेच ही गोष्ट एकदा सांगितली होता.

सलमान खानचे सोमी अलीपासून ते आताच्या यूलिया वांटूरपर्यंत अनेक मुली आणि नायिकांसोबत नाव जोडले गेलेले आहे. त्याची अनेक प्रकरणेही चांगलीच गाजली होती. परंतु सलमानने अजूनही लग्न केलेले नाही आणि आताही तो काही लग्न करेल असे वाटत नाही. परंतु चित्रपटातील घटनेप्रमाणे त्याच्या जीवनातील घटना मात्र तो अजूनही विसरलेला नाही.

सलमानने या घटनेबाबत माहिती देताना सांगितले होते, एकदा मी माझ्या गर्लफ्रेंडच्या घरी कोणी नसल्याने तिला भेटायला गेलो होतो. घरात फक्त आम्ही दोघेच होतो. आमच्या गप्पा सुरु असतानाच अचानक तिचे आई-वडिल घरी आले. मी घाबरलो आणि लपण्यासाठी जागा शोधू लागलो. बेडरूममध्ये कपाट होतेच. मी लगेचच त्या कपाटात जाऊन लपलो. परंतु कपाटात धूळ असल्याने ती माझ्या नाकात गेली आणि मला शिंका आल्या. शिंका आल्याने माझ्या गर्लफ्रेंडच्या घरच्यांपुढे माझे गुपित उघड झाले. परंतु त्यांनी जास्त धिंगाणा घातला नाही असेही सलमानने सांगितले. या गर्लफ्रेंडचे नाव मात्र त्याने उघड केले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER