जेव्हा सलमानने रणबीर कपूरच्या थोबाडीत मारली होती

Salman Khan - Ranbir Kapoor

सलमान खान (Salman Khan) स्वतःला बॉलिवुडचा (Bollywood) बादशाह समजतो. त्यामुळे आपण काहीही केले तरी चालते असे त्याला वाटत असते. यामुळेच तो कोणावरही हात उचलायलाही मागे पुढे पाहात नाही. एका मुलाखतीत मात्र त्याने मी कोणालाही मारू शकत नाही.

मला राग आला तर मी भिंतीवर डोके आपटून घेतो असे म्हटले होते. परंतु वास्तवात सलमान भडक माथ्याचा आहे. एकदा प्रख्यात निर्माता दिग्दर्शक सुभाष घई (Subhash Ghai) यांच्यावर सलमानने हात उचलला होता. दुसऱ्या दिवशी त्याने सुभाष घई यांची माफी मागितली होती. त्यानंतर सुभाष घई यांचा युवराज चित्रपटही त्याने केला होता. रणबीर कपूरला मारण्याचा किस्सा तर खूपच इंटरेस्टिंग आहे.

रणबीर कपूर तेव्हा चित्रपट क्षेत्रात आला नव्हता तेव्हाची ही घटना आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) एका नाइट क्लबमधील पार्टीत नाचत होता. थोड्या वेळाने सलमान खान तेथे आला आणि काही कारणांमुळे दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा सलमानने रणबीरच्या थोबाडीत मारले. रणबीरने घरी गेल्यानंतर पिता ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना ही घटना सांगितले. नाराज झालेल्या ऋषी कपूर यांनी सलमानचे वडिल सलीम खान यांना सांगितले. सलीमही हे ऐकून खूप नाराज झाले आणि त्यांनी सलमानची खरडपट्टी केली. एवढेच नव्हे तर ऋषी कपूर आणि रणबीरची माफीही मागायला सांगितले. सलमानने वडिलांचे ऐकले आणि त्या दोघांची माफी मागून घटनेवर पडदा टाकला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER