जेव्हा सलमानने करण जोहरच्या डोळ्यात पाणी आणले होते

salman-karan

करण जोहरने (Karan Johar)वडिलांच्या पावलावर पावल टाकत चित्रपट निर्मितीत प्रवेश केला होता. मात्र तो केवळ निर्माताच राहिला नाही तर त्याने दिग्दर्शन करण्याचाही निर्णय घेतला होता. 1998 मध्ये त्याने दिग्दर्शक म्हणून बॉलिवुडमध्ये प्रवेश करण्यासाठी कुछ कुछ होता है चित्रपटाला सुरुवात केली होती. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी असे मोठे कलाकार घेण्यात आले होते. त्यासोबतच पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेसाठी करणने सलमान खानलाही (Salman Khan) घेतले होते. करण जोहरचा हा चित्रपट सुपरहिट झाला होता. मात्र सलमान खानमुळे एके दिवशी शूटिंग सुरु असताना करणच्या डोळ्यात पाणी आले होते आणि पहिल्याच चित्रपटात हे काय झाले असा प्रश्न त्याला पडला होता.

‘कुछ कुछ होता है’च्या सेटवरील हा किस्सा स्वतः करणनेच एका मुलाखतीत सांगितला होता. शाहरुख आणि सलमान एकत्र एका चित्रपटात ही गोष्टच त्या काऴात मोठी आणि महत्वाची होती. मात्र सलमानपूर्वी करणने सलमानच्या भूमिकेसाठी अनेक कलाकारांना विचारले होते. परंतु कोणीही तयार झाले नव्हते. अखेर सलमानला करणने विचारले आणि सगळे काही ठाऊक असतानाही सलमानने काम करण्यास होकार दिला होता. सलमानने होकार दिल्याने करण प्रचंड आनंद झाला होता.

करणने सलमान प्रकरणाबाबत बोलताना सांगितले, काजोलच्या साखरपुड्याचे दृश्य आम्ही शूट करीत होतो. संपूर्ण सेट लग्नाच्या हॉलप्रमाणे सजवण्यात आलेला होता. सेटवर सगळे तयार होते. वातावरण एकदम उत्फुल्ल आणि आनंदी होते. मनीष मल्‍होत्राने मुख्य कलाकारांसाठी खूपच चांगले कपडे तयार केले होते. जतिन-ललितने संगीत दिलेल्या ‘साजन जी घर आए’ गाण्याचे आम्ही शूटिंग करीत होतो. गाणे भव्यतेने शूट केले जात असल्याने मोठ्या प्रमाणावर बॅकग्राउंड डान्सर्सही सेटवर उपस्थित होते. गाणे सुरु होताच सूटबुटातील सलमान खानला एंट्री करायची होती. सलमान खान सेटवर आल्यानंतर त्याला मी त्याच्या एंट्रीबाबत सांगितले. तर त्याने याला नकार देत एंट्रीसाठी सुटबुट नाही तर शॉर्ट्स घालून मी येईन. याचे कारण सांगताना सलमान म्हणाला होता. चित्रपटातील अमन मेहरा हा परदेशातून आलेला आहे त्यामुळे तो सुटबुटात येणार नाही तर शॉर्ट्स घालून येईल. त्यामुळे मी गाणे सुरु होताच सूटाऐवजी शॉर्ट्समध्ये प्रवेश करीन. सलमानचे म्हणणे मला पटले नव्हते. तो मोठा स्टार होता. त्यामुळे त्याचे ऐकले तर माझ्या मनातील गाणे पडद्यावर आले नसते. आता काय करायचे या विचाराने मला घाम आला आणि मी एका कोपऱ्यात जाऊन बसलो. मला रडू येऊ लागले होते. सेटवरील आनंदी वातावरण बदलून गेले होते. सगळे जण चिडीचूप होते.

मात्र काही वेळातच सलमान खो खो हसू लागला आणि करणला जवळ बोलावून त्याने सांगितले की, तो करणची गंमत करीत होता. बॉलिवुडमध्ये स्टार्स कसे वागतात हे त्याला कळावे म्हणून त्याने तशी गम्मत केली, पण त्यामुळे करणच्या डोळ्यासमोर मात्र काजवे चमकत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER