
भारतात क्रिकेटपटूंशिवाय इतर खेळाच्या ज्या खेळाडूंनी अफाट लोकप्रियता मिळवली आहे त्यात बॕडमिंटनपटू (Badminton) साईना नेहवाल (Saina Nehwal) आघाडीवर आहे. साईना केवळ भारतातच नाही तर साता समुद्रापार लोकप्रिय आहे आणि याचा प्रत्यय अलीकडेच आला जेंव्हा तिला स्वीत्झर्लंडमध्ये (Switzerland) आणखी एक साईना भेटली. स्वतः साईनाने एका व्टिटद्वारे या भेटीचे वर्णन केले आहे.
गंमत म्हणजे स्वीत्झर्लंडमधील ही साईना काही दुसरी एखादी मुलगी नाही तर एक मांजर (Cat). आहे आणि 2011 मध्ये साईनाने स्वीस ओपन (Swiss Open). स्पर्धा जिंकली होती. तिच्या या विजयाची आठवण म्हणून या मांजरीला हे नाव देण्यात आले आहे. आणि तिला तब्बल 10 वर्षांनी प्रत्यक्ष साईना भेटली आहे.
अलीकडेच ती स्वीत्झर्लंडमधील झुरिक येथील योनेक्स बॕडमिंटन हाॕलमध्ये सराव करत होती. त्यावेळी तिला ही साईना मांजर भेटली. मांजरीचे नामकरण ‘साईना’ होऊन 10 वर्षे झाले असले तर खरी साईना या साईनाला पहिल्यांदाच भेटत होती.
साईनाने जे छायाचित्र पोस्ट केले आहे त्यात साईना ‘मांजर’ हिला एका व्यक्तीने उचलून धरले आहे आणि त्यांच्यासोबत साईना नेहवालने हा फोटो काढला आहे. साईनाच्या चाहत्यांनी या फोटोचे स्वागत केले आहे.
दरम्यान, खऱ्याखुऱ्या साईनाला जेंव्हा रुपेरी पडद्यावरील साईना भेटली तेंव्हाच्या आठवणीही मजेदार आहेत आणि रुपेरी पडद्यावर साईना साकारणारी अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) त्या शेअर केल्या आहेत. परिणिती अभिनीत ‘साईना’ हा सिनेमा 26 मार्चला प्रदर्शित होणार आहे.
हैदराबाद येथे साईनाशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल परिणिती सांगते की, तिच्या घरात तर तिच्या सामानापेक्षा रॕकेटस्, शटल काॕक्स, पदकं आणि ट्राॕफीज हेच जास्त आहे. पहिल्या भेटीत साईना परिणितीला म्हणाली होती की, मी तुला कधी खेळताना पाहिलेले नाही. पण मला विश्वास आहे की तू खेळू शकशील. परिणिती म्हणते की यावर मी तिला म्हणाली होती की खरंय, मीसुध्दा मला स्वतःला खेळताना कधी बघितलेले नाही. आणि तुला भेटल्यावर मला आता वाटायला लागलेय की आपण ही भूमिका स्विकारुन नक्कीच काहीतरी गडबड केली आहे. तिच्या घरातील तिची पदकं व ट्रॉफीज बघून मला माझ्या जबाबदारीची जाणिव झाली. त्यानंतर मी दुप्पट मेहनतीने सराव सुरु केला. तिच्या केवळ एक टक्कासुध्दा मला खेळ आला तर मी स्वतःला खूप यशस्वी समजेन.
साईनाची भूमिका करणे फारच आव्हानात्मक आहे पण तिने आम्हाला पूर्ण सहकार्य केले. तिने तिच्याबद्दलची शक्य तेवढी माहिती आम्हाला दिली. माझ्या प्रत्येक प्रश्न, शंका व चौकशीला तिने प्रतिसाद दिला.
परिणिती म्हणते की सर्वांप्रमाणेच साईनाची एक सफल खेळाडू बनवल्यानंतरचा प्रवास मला माहित होता पण या सफलतेपर्यंत ती कशी पोहोचली, ती कुठे व कशी लहानची मोठी झाली, तिला कुणी कुणी मदत केली, तिचे हिरो कोण आहेत याबद्दल मला काहीच माहित नव्हते.
‘साईना’ या सिनेमात साईनाची भूमिका सुरुवातीला श्रध्दा कपूर करणार होती पण नंतर तिच्याजागी परिणिती चोप्रा आली.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला