जेव्हा करीना कपूरच्या प्रेग्नेंसीवर सैफची पहिली पत्नी अमृता सिंगने दिली होती अशी प्रतिक्रिया

Kareena Kapoor Khan - Amrita Singh

हे सर्वांना माहीत आहे की, सध्या करीना कपूर (Kareena Kapoor) गर्भवती आहे. असे म्हटले जात आहे की ती तीन महिन्यांची गरोदर आहे आणि पुढच्या वर्षी फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये कदाचित बाळाला जन्म देईल. करीना आणि तिचा नवरा सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी एकत्रितपणे चाहत्यांसमवेत ही चांगली बातमी शेअर केली. सध्या करीना गर्भावस्थेचा आनंद लुटत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे करीना मुंबईत (Mumbai) आपले असाइंमेंट्स करत आहे. कारण या महिन्याच्या अखेरीस दिल्लीत तिच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करावी लागेल. दरम्यान, सैफची पहिली पत्नी अमृता सिंगचा (Amrita Singh) याबद्दलचा एक किस्सा व्हायरल होत आहे.

चार वर्षांपूर्वी करीना कपूर पहिल्यांदा गर्भवती झाली होती. त्यावेळी एका पत्रकाराने अमृता सिंगला फोन करून प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सांगितले होते.

रिपोर्टरने अमृताला फोन करून करीनाच्या गरोदरपणाविषयी तिला कसे वाटते हे विचारताच तिला राग आला.

ती म्हणाली होती- “तुम्ही असा प्रश्न विचारण्याचे धाडस कसे करू शकता? तुम्ही कोण आहात? मला पुन्हा फोन करू नका.”

आजही अमृताला करीना आणि तिचा मुलगा तैमूर यांच्याविषयी बोलायला आवडत नाही. इतकेच नव्हे तर अमृताची मुले सारा आणि इब्राहिम सावत्र आई करीनाच्या अगदी जवळ आहेत आणि ते बरोबर दिसतात आणि अमृता कधीही करीनाबरोबर दिसली नाही.

सैफने १९९१ मध्ये आपल्यापेक्षा १३ वर्षांनी मोठी असलेल्या अमृता सिंगशी लग्न केले. दोघे १३ वर्षापर्यंत एकत्र राहिले आणि २००४ मध्ये घटस्फोट झाला. या घटस्फोटाच्या सुमारे ८ वर्षांनंतर सैफने २०१२ मध्ये त्याच्यापेक्षा १० वर्षांनी लहान करीना कपूरशी लग्न केले. २० डिसेंबर २०१६ रोजी करीनाने तैमूरला जन्म दिला.

एका मुलाखतीत करीना म्हणाली – जेव्हा तैमूरच्या वेळी मी गरोदर होते, तेव्हा प्रत्येक जण मला भरपूर खायला सांगायचा आणि म्हणूनच माझे वजन २५ किलोने वाढले होते. मला पुन्हा तेच करायचे नाही. मला फक्त स्वस्थ खावे लागेल आणि तंदुरुस्त रहावे लागेल.

ती म्हणाली- मला वाटते पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी प्रत्येक जण म्हणायचा, पराठा खा, तूप खा, दूध प्या. परंतु आता मी म्हणते की, मी हे सर्व यापूर्वी केले आहे. मला माहीत आहे की माझ्या शरीराला कशाची गरज आहे. करीना पुढे म्हणाली- माझ्या डॉक्टरांनी सांगितले आहे की, तुम्ही दोन लोकांचे भोजन खाऊ नका. फक्त चांगले खा आणि स्वतःची काळजी घ्या.

सांगण्यात येते की, आमिर खानचा चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ची शूटिंग या महिन्याच्या शेवटी दिल्लीत सुरू होणार आहे. या चित्रपटात करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. हे शूटिंग कित्येक आठवडे चालण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सैफ आणि करीनाने यावेळी पतौडी पॅलेसमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. करीना शूटिंगसाठी पतौडी पॅलेस येथून आपल्या कारने दिल्लीला येणे-जाणे करेल.

सैफ, करीनासोबत त्यांचा मुलगा तैमूर, तैमूरची नैनी, सैफचा पर्सनल असिस्टंट, जिम प्रशिक्षकही येतील. सैफची आई शर्मिला टागोरही आपली सून, मुलगा आणि नातवंडे यांच्याबरोबर काही दिवस वेळ घालवणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER