जेव्हा सचिन ब्रॅड हॉगला म्हणाला होता, ‘हे पुन्हा कधी नाही होणार’

Sachin tendulkar & Brad Hogg

सचिन तेंडुलकरने २००७ मध्ये ब्रॅड हॉगला दिलेल्या ऑटोग्राफमध्ये केली होती भविष्यवाणी. म्हणाला, ‘हॉग, पुन्हा कधी बाद नाही करू शकशील.’

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर क्रिकेट कारकिर्दीत अनेकदा त्याच्या चाहत्यांना आणि त्या खेळाडूंनी ऑटोग्राफ दिले असतील ज्यांच्या बरोबर किंवा ज्यांच्या विरुद्ध खेळले आहे. पण त्याने दिलेला एक ऑटोग्राफ, त्याने केलेली एक भविष्यवाणीदेखील सिद्ध झाली. सचिनने २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी चाइनामैन गोलंदाज ब्रॅड हॉगला ऑटोग्राफ दिला होता. ५ ऑक्टोबर २००७ रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर वनडे मालिकेच्या तिसर्‍या सामन्यादरम्यान भारताला विजयासाठी २९१ धावांचे लक्ष्य ठेवले होते.

त्या सामन्यात सचिन गौतम गंभीरबरोबर डाव सुरू करण्यासाठी आला आणि ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रॅड हॉगने २७ व्या षटकात सचिनला बोल्ड केले होते. हॉगने सांगितले की, सामन्यानंतर सचिनजवळ त्याच्याकडून त्याच चित्रावर ऑटोग्राफ घेण्यासाठी गेलो होता. सचिनने अगदी साधेपणाने ऑटोग्राफ दिला; परंतु चित्रात असेही लिहिले की, ‘आता पुढच्या वेळी पुन्हा बाद करता येणार नाही.’ हॉग म्हणाला, ‘त्या सामन्यात मी त्याला बाद केले व त्यानंतर स्वत:साठी ऑटोग्राफ देण्यास सांगितले. त्याने मला ऑटोग्राफ दिला; पण माझ्यासाठी एक संदेशही लिहिला, ‘असं पुन्हा कधी होणार नाही हॉग.’ विशेष म्हणजे सचिनने म्हटलेल्या गोष्टी अगदी अचूकपणे समोर आल्या आणि त्यानंतर हॉग पुन्हा सचिनची विकेट घेण्यास सक्षम नव्हता.

पण तो ऑटोग्राफ हा एक अत्यंत मौल्यवान वस्तू आहे. तो पुढे म्हणाला, ‘हे फार मौल्यवान आहे. सचिन तेंडुलकरसारख्या खेळाडूबरोबर मैदानावर खेळणे हा सन्मान आहे. त्याला गोलंदाजी करणे हा एक चांगला अनुभव आहे. जर मी तिथे आहे, तर मी त्याच्याशी स्पर्धा करण्यासाठी आणि त्याच्यासाठी जीवन कठीण करण्यासाठी तेथे आहे.” सचिनने या सामन्यात ७१ चेंडूंत ४३ धावा केल्या होत्या आणि युवराजसिंगचे शतक असूनही भारताला त्या सामन्यात ४७ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER