..जेंव्हा सचिनने रिक्षाचालकाला फॉलो केले!

Sachin Tendulkar

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला (Sachin Tendulkar) जगभरात कोट्यवधी चाहते आहे आणि त्यापैकी लक्षावधी त्याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. त्याच्या 100 एमबी (100 MB) संकेतस्थळाला भेट देत असतात. पण सचिनने चक्क एका रिक्षाचालकाला (Autodriver) फॉलो केल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. मंगेश फडतरे (Mangesh Phadtare) हे त्या रिक्षा चालकाचे नाव..जानेवारी 2020 मधील तो व्हिडिओ आहे. पण सचिनने त्याला का फॉलो केले?

तर झाले असे की सचिन मुंबईत कार घेऊन निघाला होता. स्वतः ड्राईव्ह करत होता. पण मुंबईत बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असल्याने काही नेहमीचे रस्ते वन वे झाले आहेत. त्यामुळे मास्टर ब्लास्टरची कोंडी झाली आणि त्याला हायवेकडे कसे जायचे हाच मार्ग समजेना. अशावेळी हा रिक्षाचालक मंगेश फडतरे त्याच्या मदतीला आला.

तो सचिनला म्हणाला की मी तुम्हाला हायवेपर्यंत सोडतो, मला फॉलो करा. आणि सचिनलाही कौतुक वाटले आणि म्हणून त्याने या प्रवासाचा व्हिडीओ शेअर केलाय. त्यात सचिन सांगतो की मी रिक्षेला फॉलो करतोय आणि तो रिक्षाचालक मला मदत करतोय.

या प्रवासात पुढे एका सिग्नलवर सचीन त्या रिक्षाचालकाला त्याचे नाव व कुठे राहता असेसुध्दा विचारतो. त्यावेळी तो रिक्षाचालक आपले नाव मंगेश फडतरे आहे असे सांगतानाच आपण तुमचे मोठे फॕन आहोत आणि माझी मुलगीसुध्दा तुम्हाला फाॉलो करत असते असे सांगितले. त्या रिक्षाचालकाशिवाय आपल्याला रस्ता मिळणे अवघड होते असेही सचिनने या पोस्टमध्ये मान्य केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER