जेव्हा रॉबिन उथप्पाला बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या करण्याची इच्छा झाली, जाणून घ्या काय होते ते कारण

Robin Uthappa

टीम इंडियाकडून खेळलेला रॉबिन उथप्पा एकेकाळी डिप्रेशनचा बळी झाला होता, ज्यामुळे त्याने आत्महत्येचा विचार केला होता.

टी -२० विश्वचषक जिंकणार्या भारतीय क्रिकेट संघाचा सदस्य असलेला विकेटकीपर फलंदाज रॉबिन उथप्पाने खुलासा केला आहे की, २००९ ते २०११ दरम्यान तो तणावातून झुंजत होता आणि एक वेळ अशीही आली जेव्हा त्याने आत्महत्या करण्याचा विचारही केला होता. उथप्पाने २००६ साली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाकडून पदार्पण केले. त्याने आतापर्यंत भारतासाठी ४६ एकदिवसीय सामने आणि १३ टी-२० सामने खेळले आहेत.

उथप्पा ने राजस्थान रॉयल्स फाउंडेशनच्या वतीने एनएस वाहिया फाउंडेशन एंड मैक्लीन हॉस्पिटल (हॉवर्ड मेडिकल स्कूलशी संलग्न) च्या सहकार्याने मानसिक आरोग्याबद्दल आयोजित करण्यात आलेले वेबीनारचे ‘माइंड, बॉडी और सोल’ च्या पहिल्या सत्रामध्ये म्हणाले, ‘जेव्हा मी २००६ मध्ये पदार्पण केले तेव्हा मला माझ्याबद्दल फारसं माहित नव्हतं, नंतर मी बर्याच गोष्टी शिकत होतो आणि सुधारत होतो. आता मला माझ्याबद्दल बरेच काही माहित आहे आणि माझ्या विचारांसह मला स्वतःबद्दल खात्री आहे. जर मी कुठेतरी अलकाला गेलो तर आता स्वत: ला हाताळणे मला सोपे आहे.’

तो म्हणाला, ‘मला असं वाटतं की आज मी या ठिकाणी पोहोचलो आहे कारण मला बर्याच कठीण क्षणांचा सामना करावा लागला आहे. मी खूप तणावग्रस्त होतो आणि मला आत्महत्या करण्याचे सुद्धा विचार येत होते. मला आठवते की हे २००९ आणि २०११ मध्ये हे नियमितपणे घडत होते आणि दररोज मला असे विचार येत होते.’

उथप्पा पुढे म्हणाला, ‘एक काळ असा होता जेव्हा मी क्रिकेटबद्दल विचारही करत नव्हतो. हे माझ्या मनापासून खूप दूर गेले होते. मी असा विचार करत होतो की आजचा दिवस मी कसा जगू आणि दुसर्या दिवसापर्यंत मी कसा जिवंत राहू शकतो. माझ्या आयुष्यात हे काय घडत आहे आणि मी कोणत्या मार्गावर चालत आहे.’

यष्टीरक्षक फलंदाज म्हणाला, ‘क्रिकेट खेळत असताना असे विचार मनापासून दूर राहायचे, पण जेव्हा सामने नसायचे ऑफ सीझनमध्ये खूप कठीण व्हायचे. त्या दिवसांत मी बसून असा विचार करत होतो की मी ३ पर्यन्त काउन्ट करणार आणि धावत जाऊन बाल्कनीतून उडी मारील, पण मग असे काहीतरी होते जे मला असे करण्यापासून थांबत असायचे.’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER