जेव्हा रामगोपाल वर्माच्या बायकोने उर्मिलाला मारले होते

Maharashtra Today

बॉलिवूडमध्ये प्रेमप्रकरणे मोठ्या प्रमाणावर होतात. त्यापैकी काही यशस्वी होतात तर काही अयशस्वी. नायक-नायिका एकत्र काम करीत असल्याने त्यांच्यात सततच्या सहवासाने प्रेम वाढू लागते. तर कधी कधी दिग्दर्शक आणि नायिकांमध्येही प्रेम फुलते. दिग्दर्शक आणि नायिकांमधील प्रेमाच्या काही घटना सगळ्यांनाच ठाऊक आहेत. यापैकीच एक जोडी होती रामगोपाल वर्मा (Ramgopal Varma) आणि उर्मिला मातोंडकरची. (Urmila Matondkar) रामगोपाल वर्माने उर्मिलाच्या करिअरला जसा आकार दिला त्याच प्रकारे केवळ रामगोपाल वर्माचे सिनेमे करीत असल्याने उर्मिलाला दुसऱ्या निर्मात्यांनी सिनेमात संधीच दिली नाही. या दोघांचे प्रेम प्रकरण पुढे गेले नाही मात्र उर्मिलामुळे रामगोपाल वर्माने त्याच्या बायकोला घटस्फोट मात्र अवश्य दिला होता.

उर्मिलाने जेव्हा बॉलिवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे ती लगेचच आघाडीची नायिका झाली होती. तिच्यामुळे अनेक निर्मात्यांनी दुसऱ्या अभिनेत्रींना सिनेमातून काढून तेथे उर्मिलाची वर्णी लावली होती. रामगोपाल वर्मावरही उर्मिलाच्या सुंदरतेची नशा चढली होती. रामगोपाल वर्णा ‘द्रोही’ सिनेमा करीत होता. या सिनेमाच्या एका गाण्यात उर्मिलाच्या डांसने तो प्रचंड प्रभावित झाला. आणि त्याने लगेचच उर्मिलाला त्याच्या आगामी ‘रंगीला’ सिनेमासाठी साईन केले. या सिनेमात आमिर खान आणि जॅकी श्रॉफही होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपर डुपरहिट ठरला आणि उर्मिलाची गाडी सुसाट धावू लागली. मात्र रामगोपाल वर्मा उर्मिलाच्या प्रचंड प्रेमात पडलेला असल्याने तो त्याच्या सिनेमात उर्मिलासाठी खास जागा तयार करू लागला होता. एका सिनेमात तर त्याने माधुरी दीक्षितच्या ऐवजी उर्मिला मातोंडकरला साईन केले होते.

या दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती रामगोपाल वर्माच्या बायकोला झाली होती. एकदा एका सेटवर रामगोपाल वर्माची बायको पोहोचली आणि तिने थेट उर्मिलाच्या कानाखाली आवाज काढला होता असे म्हटले जाते. या घटनेमुळे रामगोपाल वर्मा नाराज झाला आणि त्याने बायकोशी थेट घटस्फोटच घेतला. नंतर रामगोपाल वर्माचे सिनेमे फ्लॉप होऊ लागले आणि उर्मिलाची करिअरही संपली. सिनेमे मिळत नसल्याने उर्मिलाने बॉलिवूडला रामराम केला. वयाच्या ४२ व्या वर्षी तिने तिच्यापेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या काश्मीरमधील व्यापारी मोहसीन अख्तर मीरसोबत लग्न केले. त्यानंतर राजकारणात प्रवेश करून प्रथम काँग्रेस आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून ती राजकारण करू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER