जेव्हा प्रियांका चोप्राला कोरियोग्राफरने खडसावले होते

Priyanka Chopra

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) जेव्हा बॉलीवूडमध्ये (Bollywood) नवीनच आली होती तेव्हा, एका चित्रपटाच्या सेटवर गाण्याच्या शूटिंगच्या वेळी ती सारखी चुकत होती. एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 40 वेळा रिटेक करावा लागला होता. प्रियांका चोप्राच्या या सारख्या होणाऱ्या चुकीमुळे कोरियोग्राफर प्रचंड संतापला होता. आणि त्याने सगळ्यांसमोर प्रियांकाला चांगलेच खडसावले होते. एवढेच नव्हे तर जोपर्यंत डान्स येत नाही तोपर्यंत सेटवर येऊ नको, असेही बजावले होते. स्वतः प्रियांकानेच ही गोष्ट तिच्या एका मुलाखतीत सांगितली होती. अर्थातच ही मुलाखत आताची नसून खूप वर्षांपूर्वीची आहे. प्रियांकाचा हा मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

2003 मध्ये आलेल्या ‘अंदाज’ चित्रपटात प्रमुख नायिका म्हणून प्रियांका पडद्यावर आली होती. या चित्रपटाच्या गाण्याच्या शूटिंगवेळी घडलेला हा किस्सा आहे. मुलाखतीत प्रियांकाने या गाण्याच्या शूटिंगच्या वेळचा किस्सा सांगताना म्हटले होते, ते गाणे माझ्या सुरुवातीच्या गाण्यांपैकी एक होते. या गाण्याचा कोरिओग्राफर सरोज खान यांचा मुलगा राजू खान होता. शूटिंग सुरू झाल्यानंतर मी सारखी चुकत होते. जवळ जवळ चाळीस वेळा रिटेक झाला, त्यामुळे राजू खान प्रचंड चिडला होता. आणि त्याने हातातील माईक फेकून दिला होता. एवढेच नव्हे तर, तू मिस वर्ल्ड आहेस म्हणून तुला जर वाटत असेल की तू अभिनेत्री होऊ शकतेस तर ते चुकीचे आहे जा. अगोदर डान्स कसा करायचा ते शिकून ये आणि नंतर डान्स कर असे म्हटले होते.

प्रियांका पुढे म्हणते, गाण्याच्या शूटिंगच्या वेळेसच अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल गरोदर होती आणि तिला कळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग काही दिवस थांबवण्यात आले होते. त्यामुळे मला नृत्य शिकण्यासाठी वेळ मिळाल आणि मी कथ्थक शिकून घेतले. जर तुम्हाला काही येत नसेल आणि तुमच्यात शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही खूप काही करू शकता एखाद्या गोष्टीसाठी अभ्यास करण्याची किती आवश्यकता आहे हे मला त्यावेळी समजले. कथ्थक गुरु पंडित वीरू कृष्णन यांच्याकडून मी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले होते. यासाठी मी रोज सहा सहा तास अभ्यास करत असे. त्यानंतर जेव्हा मी सेटवर आले तेव्हा मी चांगले नृत्य करीत होते. असेही तिने या मुलाखतीत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER