जेव्हा सत्ता अहंकारी होते तेव्हा तिचं पतन होतं आणि महाराष्ट्रात सध्या तेच दिसत आहे – देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis & uddhav thackeray

पटना : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बिहार निवडणूक प्रचारक म्हणून पक्षाने जबाबदारी दिली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बिहार येथून पत्रकारांना संबोधित केले. त्यावेळी पत्रकारांच्या विविध प्रस्नांना फडणवीसांनी मोकळेपणाने व स्पष्ट उत्तरं दिली व पक्षाची ठाम भूमिका मांडली.

महाराष्ट्रात सुरू असलेल्या कंगना – शिवसेना वाद, तसेच माजी नौदलाच्या अधिका-याला शिवसेनेकडून झालेली मारहाण या प्रकरणावर पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न केले त्यावर फडणवीस यांनीही आपले मत मांडले.

दरम्यान, सामनाच्या कंगनाशी संबंधीत अग्रलेखावर पत्रकारांनी केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस म्हणाले, “सामना हे शिवसेनेचं वृत्तपत्र असून यातून शिवसेनेचं म्हणणं मांडलं जातं. शिवसेनेला जर वाटत असेल की कंगना पाण्यात राहून मगरीशी वैर घेत आहे , तर हा शिवसेनेचा अहंकार बोलत आहे. लोकांना अहंकार आव़डत नाही. जेव्हा सत्ता अहंकारी होते तेव्हा तिचं पतन होतं आणि राज्यात सध्या तेच दिसत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

माजी नौदल अधिका-याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली कथित मारहाण प्रकरणावर फडणवीस म्हणाले, हे निषेधार्ह असून, ही तर राज्यपुरस्कृत दहशत आहे अशी टीका फडणवीस यांनी उद्धव सरकारवर केली.

फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात राज्यपुरस्कृत दहशतवादाची अवस्था निर्माण झाली आहे. मी कालच ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंना हा गुंडाराज थांबवण्याचे आवाहन केलं आहे. निवृत्त नौदल अधिकाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करणं आणि माध्यमांनी दबाव बनवल्यानंतर ६ लोकांना अटक करणं आणि दहाच मिनिटांत सोडून देणं हे चुकीचं आहे. जर अशा प्रकारे गोष्टी होत असतील तर अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रात यापूर्वी कधीही झालं नव्हतं.”

महाराष्ट्रात खऱचं काश्मीरसारखं वातावरण होत आहे का? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्र हे खूपच पुढारलेलं राज्य आहे. तिथली जनता सुज्ञ आहे, त्यामुळे तिथे काश्मीरसारखी वैगरे स्थिती निर्माण होणार नाही.” दरम्यान, सुशांतसिह राजपूला भाजप शांत बसमार नसल्याचा विश्वासदेखील फडणवीस यांनी यावेळी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER