जेव्हा कुणी आपल्या हिरोसोबत खेळते…

Virat Kohli - Devdutt Padikkal

यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) जे काही तरुण आणि नवे चेहरे चमकत आहेत त्यापैकी एक आहे रॉयल चॕलेंजर्स बंगलोरचा (RCB) डावखुरा सलामीवीर देवदत्त पडीक्कल (Devdutta Padikkal) या गड्याने आयपीएलमध्ये असा विक्रम केलाय की तो भल्या भल्या फलंदाजांना जमलेला नाही.

शनिवारी राजस्थान रॉयल्साविरुध्द (Rajasthan Royals) त्याने 45 चेंडूत 63 धावा केल्या आणि यंदाच्या या स्पर्धेतील चार सामन्यांतील आपले तिसरे अर्धशतक झळकावले. यासह आयपीएलमध्ये आपल्या पहिल्या चार सामन्यांतच तीन अर्धशतके झळकावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

याच्याआधी आयपीएलमध्ये गौतम गंभीर, शाॕन मार्श, रोहित शर्मा व लेंडल सिमन्स यांनी आपल्या पहिल्या पाच सामन्यात तीन अर्धशतके केली होती. पण चार सामन्यात तीन अर्धशतके करणारा देवदत्त हा पहिलाच.

आपल्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात त्याने हैदराबादविरुध्द 56, पंजाबविरुध्द फक्त एक, मुंबई इंडियन्सविरुध्द 54 आणि आता राजस्थानविरुध्द 63 धावांची खेळी केली आहे.

या खेळीदरम्यान त्याने कर्णधार विराट कोहलीसोबत 99 धावांची भागिदारी केली. यानिमित्ताने त्याचे विराट कोहलीसोबत खेळायचे स्वप्न साकार झाले. यानिमित्ताने त्याने विराट कोहलीसोबतचा आपला एका जुना फोटोसुध्दा शेअर केलाय.

विराट कोहली हा देवदत्त पडीकल्लचा अतिशय आवडता खेळाडू. लहानपणापासूनच तो विराटला बघत आलाय आणि आपण ज्या खेळाडूचे दिवाने आहोत त्याच खेळाडूसोबत खेळतोय हे खरे वाटत नाही असे त्याने म्हटले आहे.

काल राजस्थानविरुध्द विराटसोबत खेळायच्या अनुभवाबद्दल तो म्हणतो की, मी थकलो, पायात गोळे आले तरी त्यांनी मला खेळत राहण्यास प्रेरीत केले. ते म्हणाले की खेळत रहा, आपल्याला संघाला पुढे न्यायचे आहे.

विराटनेही देवदत्तचे कौतुक केले आहे. त्याच्याबद्दल विराट म्हणतो की, देवदत्तकडे उंची आहे आणि चांगली नजर आहे. तो डावखुरा आहे आणि त्याचे फटके नेहमी खणखणीत असतात. सहसा तो चकतोय, वेडेवाकडे फटके मारतोय असे घडत नाही. मुळात तो धोका पत्करुन खेळतोय असे वाटतच नाही. शिवाय त्याला खेळाची चांगली समजही आहे आणि शिकायची त्याची तयारी आहे. असाच तो शिकत राहिला तर भविष्यात आरसीबीचा संघ अधिक मजबूत होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER