रागाच्या भरात जेव्हा नूतन यांनी संजीव कुमार यांना दिले होते चापट तेव्हा सर्वाना आश्चर्य वाटले, जाणून घ्या किस्सा

Nutan - Sanjeev Kumar

आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयाने आजही सर्वांच्या हृदयात जिवंत असलेल्या अभिनेत्री नूतन यांची आज पुण्यतिथी आहे. २१ फेब्रुवारी १९९१ रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी नूतन यांनी या जगाला निरोप दिला. नूतन केवळ व्यावसायिक कारणांमुळेच चर्चेत नव्हत्या तर वैयक्तिक आयुष्यामुळेही. असाच एक किस्सा आज आपण जाणून घेऊ जेव्हा नूतन (Nutan) यांनी संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांना जाहीर चापट मारली.

खरं तर बॉलिवूडमध्ये (Bollywood) बऱ्याचदा असं पाहायला मिळतं की एखाद्या अभिनेत्याची किंवा अभिनेत्रीची केमिस्ट्री खूप चांगली आढळली तर कधीकधी त्यांच्यात अफेयरच्या बातम्या येऊ लागतात. अशा परिस्थितीत जिथे काही स्टार्स त्यावर प्रतिक्रिया देतात, काहींना हे ठाऊक असते की चित्रपट बदलण्याबरोबरच बातमीत दिसणार्‍या सहकारी कलाकाराचे नावही बदलले जाईल, ज्यामुळे ते त्यावर प्रतिक्रिया देत नाहीत.

असेच काहीतरी नूतन यांच्या बाबतीत घडले जेव्हा त्या संजीव कुमार सोबत काम करत होत्या. सुरुवातीला नूतन आणि संजीव एकमेकांशी जास्त बोलायचे नाहीत, परंतु हळू हळू दोघांमध्ये चांगली मैत्री वाढली. ज्यानंतर त्यांच्या अफेअरची बातमी समोर आली. यामुळे नूतन यांना खूप त्रास व्हायचा आणि बहुतेकदा त्या त्यांच्या नवऱ्याशी याबद्दल भांडत असे.

या वृत्तांच्या दरम्यान, एक दिवस नूतन १९६९ मध्ये संजीव कुमार यांच्यासमवेत ‘देवी’ चित्रपटासाठी शूटिंग करत होत्या. शूटिंगच्या वेळी नूतन यांनी एक मॅगझिन वाचले, ज्यात त्यांच्या आणि संजीव यांच्या अफेअरविषयी छापले होते. हा अहवाल वाचून नूतन खूप चिडल्या आणि त्यांनी संजीवाला सेटवरच चापट मारली. बरेच लोक म्हणतात की त्यांनी हे आपल्या पतीच्या सांगण्यावरून केले.

विशेष म्हणजे नूतन यांनी बर्‍याच चित्रपटांमध्ये आपल्या कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नूतन यांनी देव आनंद, सुनील दत्त ते राज कपूर यांच्यासोबत काम केले आहे. नूतन यांच्या हिट लिस्टमध्ये अनारी, सुजाता, पेइंग गेस्ट, सीमा, बंदिनी, सरस्वती चंद्र, मिलन आणि मैं तुलसी तेरे आंगन की अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER