मृणालला जेव्हा राग येतो

Mrunal Dusanis

कलाकारांच्या अभिनया सोबत त्यांचे नखरे, त्या कुठल्या गोष्टीवर चिडतात, त्यांना कुठल्या गोष्टीचा जास्त राग येतो अनेक गोष्टींची चर्चा रंगत असते. मृणाल दुसानिस (Mrunal Dusanis) च्या बाबतीत सध्या ही चर्चा व्हायरल होत आहे. आणि दस्तुरखुद्द शशांक केतकर यानेच मृणालच्या रागा विषयी भांडाफोड केली आहे.

टीव्ही मालिकांमधील अतिशय शांत आणि सोज्वळ चेहरा कोणाचा असेल असा जर प्रश्न विचारला तर काही क्षणातच आपण नाव सांगू ते मृणाल दुसानीसचे. सध्या सुखाच्या सरीनी हे मन बावरे या मालिकेत मृणाल साकारत असलेली अनुश्री दीक्षित ही भूमिका लोकप्रिय झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, मृणाल चेह्र्यवरुन्ंं इतकी शांत दिसत असली तरी अत्यंत रागीट आहे. आणि तिला राग आला की ती सरळ समोर दिसेल त्याला गेट लॉस्ट म्हणते .या मालिकेतील तिचा सहकलाकार शशांक केतकर यांने हा किस्सा सांगितला.

अर्थात मृणाल ला राग आला की ती काय बोलते हे जेव्हा शशांक ने सांगितले तेव्हा मात्र मृणालने शशांक च्या भन्नाट निरिक्षणाला दिलखुलास हसून दाद दिली.

शशांक आणि मृणाल सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या मालिकेतील सिद्धार्थ आणि अनु यांची जोडी प्रेक्षकांना आवडत आहेच आणि त्याचा पुरावा प्रेक्षकांनी लोकप्रिय जोडी पुरस्कारानेही दिला आहे. एका मुलाखतीच्या निमित्ताने मृणालच्या रागाबद्दल चा विषय निघाला आणि शशांकला हा किस्सा सांगण्याचा मौह आवरला नाही. शशांक म्हणाला, तशी मृणाल खूप शांत असते पण जेव्हा ती चिडते तेव्हा तिच्या समोर जी व्यक्ती असते तिला ती एकच शब्द बोलते आणि तो शब्द असतो गेट लॉस्ट. पण मजा अशी आहे की मृणाल ला जेवढा राग जास्त आलेला असतो तेवढाच गेट लॉस्ट म्हणण्याचा सूर मात्र खालच्या पट्टीचा असतो हे गणितही मला अजूनही कळलेलं नाही.

राग आल्यानंतर की समोरच्या व्यक्तीला गेट लॉस्ट म्हणत असल्याचा मृणालने हसून जरी मान्य केलं असलं तरी तिने मोकळेपणाने दाद दिली. शशांकने अजून एक गोष्ट सांगितली की मृणालला समोरच्या सहकलाकार कडून एक चूक सारखी सारखी झालेली अजिबात आवडत नाही. तिचं अस मत आहे की आपल्या एका रिटेक मुळे प्रॉडक्शनच खूप नुकसान होत असत. त्यामुळे कलाकारांनी कॅमेऱ्यासमोर शॉट द्यायला येताना पूर्वतयारी केली तर ते नुकसान होणार नाही. मात्र कधीतरी सहकलाकार चुकतो पहिल्या-दुसऱ्यादा त्याला माफ करते पण त्याच्याकडून पुन्हा चूक झाली तर शेवटी, हे देवा त्याला माफ कर असं म्हणत ती देवाला साकडे घालते.

माझिया प्रियाला प्रीत कळेना या मालिकेतून मृणाल ने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. या मालिकेत तिचा सहकलाकार अभिजीत खांडकेकर होता तर त्यानंतर असं सासर सुरेख बाई या मालिकेत मृणालने रंगवलेली जुई देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. असं सासर सुरेख बाई ही मालिका सुरू असतानाच नीरज मोरे या अमेरिकास्थित इंजिनियरसोबत तिने लग्न केलं आणि त्यामुळे तिने या मालिकेला मध्येच निरोप देत अमेरिकेला काही दिवस राहण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत असताना तिला अभिनय खुणावत होता आणि म्हणूनच तिने पुन्हा एकदा छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय घेतला त्यानंतर गेल्या दोन वर्षापासून सुखाच्या सरिनी हे मन बावरे या मालिकेच्या निमित्ताने तिचा मुक्काम मुंबईत आहे.

ही बातमी पण वाचा : सईच्या लग्नाचा बार नोव्हेंबरमध्ये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER