खासदार सुप्रिया सुळेंनी बारामतीत रस्त्याच्या कडेला अंजिरचा आस्वाद घेतांनाचा फोटो केला शेयर

Supriya Sule

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) सोशल मीडियावरही चांगल्या सक्रीय असतात. सुळे यांनी यावेळी त्यांच्या मतदार संघातून मुंबईच्या दिशेने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या फळ आणि पालेभाज्यांचे स्टॉलपाहून पाहून गाडी थांबवली. अंजिर, संत्री, पपई आणि हिरव्यागार पालेभाज्या पाहून सुप्रिया सुळे यांना मोह आवरता आला नाही. सुप्रिया यांनी आपल्या गाडीतून खाली उतरुन अंजिरचा आस्वाद घेतला आणि पालेभाज्यांचीही खरेदी केली.

सुप्रिया सुळे चक्क आपल्या स्टॉलवर आल्याचं पाहून फळ विक्रेत्या महिलांनाही अप्रूप वाटलं. त्यांनी सुप्रिया सुळेंसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली आणि सुप्रिया सुळे यांनीही त्यांची इच्छा पूर्ण केली. विशेष म्हणजे, फेसबुक लाइव्ह करताना सुप्रिया यांनी विक्रीसाठी आणलेली फळं नेमकी कुठली आहेत याचीही माहिती जाणून घेतली. फळांमध्ये फक्त संत्रीसोडून इतर सर्व फळं बारामतीत पिकवलेली असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER