नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलले की, लोक चंपा म्हणतात : राष्ट्रवादीच्या नेत्याची चंद्रकांतदादांवर टीका

Amol-Mitkari-Ajit-Pawar-Chandrakant-Patil-Maharashtra-Today

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil)यांच्यात आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत . आता या वादात राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari)यांनी उडी घेतली आहे .

नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं ‘चंपा’(Champa) म्हणतात, असा टोला देखील त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे .

दिल्लीतील चौकीदारचे लक्ष देशाच्या तिजोरीवर आणि गल्लीतल्या ठेकेदारचं लक्ष सिल्वर ओकच्या ड्राव्हरवर आहे. करवीरच्या खजिन्यावर असाच डोळा असेल म्हणुन करवीरकरांनी हाकललं होतं. त्यामुळं नंतर कोथरूड शोधावं लागले , असे मिटकरी आहे .

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला म्हणून, आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५४ आमदारांची यादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ड्रॉवरमधून चोरून राज्यपालांना सादर केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे. असे वक्तव्य पाटील यांनी केले होते .

यावर चंद्रकांत पाटील यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, अशी टीका मिटकरी यांनी केली होती.

तम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button