… जेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरेंना मिळाली अनोखी भेटवस्तू

Raj Thackeray

मुंबई : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोमवारी यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली ‘महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेची’ नवी कार्यकारिणी जाहीर केली. यादरम्यान किल्लेदार यांनी , राज ठाकरे यांना एक अनोखी भेट दिली आहे .

चांदीच्या शिक्क्यामध्ये राज ठाकरे यांची प्रतीमा असलेलं स्मृतीचिन्ह त्यांना भेट म्हणून देण्यात आले . या स्मृतीचिन्हात राज ठाकरे यांच्या प्रतीमेशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडणूक चिन्ह असलेले रेल्वे इंजिनदेखील आहे. राज ठाकरे यांच्यासाठी चांदीच्या स्वरूपातील त्यांचे छायाचित्र असलेले आणि दुसऱ्या बाजूला पक्षाचं चिन्ह असलेलं स्मृतीचिन्ह तयार करण्याची इच्छा मनात होती. ती आता पूर्णत्वास आली आहे,” अशी प्रतिक्रिया यशवंत किल्लेदार आणि आनंद प्रभू यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER