जेव्हा राजीव गांधींना मेहमूद यांनी दिली चित्रपटाची ऑफर

Mehmood offered the film to Rajiv Gandhi

माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची पर्सनॅलिटी खूपच आकर्षक होती. गोरेपान, उंच, दिसायला देखणे राजीव गांधी चित्रपटाचा नायक म्हणून शोभले असते. फार कमी जणांना ठाऊक असेल की, मेहमूद (Mehmood ) यांनी जेव्हा ‘बॉम्बे टू गोवा’ची (Bombay to Goa) योजना आखली तेव्हा सर्वप्रथम अमिताभऐवजी राजीव गांधी यांना नायक म्हणून साईन करणार होते. हा किस्सा खूपच मजेदार आहे.

मेहमूद यांनी १९६६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मद्रास टु पॉन्डिचेरी’ (Madras to Pondicherry) या तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकचे राईट्स घेतले आणि कलाकार निवडीस सुरुवात केली. अमिताभ बच्चन आणि राजीव गांधी चांगले मित्र होते. एक दिवस अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) राजीव गांधी यांना सोबत घेऊन मेहमूदच्या घरी भेटायला गेले. मेहमूद तेव्हा ड्रग्ज घेत. मेहमूदचा भाऊ अनवर या दोघांनाही ओळखत असे.

त्याने मेहमूद यांच्याशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यापूर्वीच मेहमूद यांनी ड्रॉव्हरमधून पाच हजार रुपये काढले आणि अनवरला देऊन सांगितले की, अमिताभच्या मित्राला नायक म्हणून साईन कर आण परवापासून शूटिंगला येण्यास सांग. हा मुलगा अमिताभपेक्षा गोरा आणि स्मार्ट आहे. भविष्यात हा आंतरराष्ट्रीय स्टार होऊ शकेल. तेव्हा अनवर यांनी मेहमूदला राजीव गांधी यांची खरी ओळख देऊन सांगितले की, हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मुलगा आहे. तेव्हा मेहमूद यांना आपली चूक समजली आणि त्यांनी अमिताभ बच्चनला ‘बॉम्बे टू गोवा’चा नायक म्हणून साईन केले.

ही बातमी पण वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोषण आहाराचा प्रचार करणार ही नायिका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER