जेंव्हा महाराष्ट्रानं एकाच वर्षी तीन मुख्यमंत्री पाहिले होते! वाचा इंटेस्टिंग घटना

Maharashtara Today

या जगात सर्वात चंचल काय? या प्रश्नाला अनेकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद असं उत्तर दिलं जातं. अनेकदा विनोद म्हणून या विधानाकडं बघितलं जात असलं तरी वास्तवात, तारखांवरती लक्ष दिलं की तुम्हाला ही गोष्ट सहज समजेल. आजपर्यंत वसंतराव नाईक (VasantRao Naik)आणि त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस(Devendra fadnavis) सोडले तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच मुख्यमंत्र्याला त्याचा पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करता आला नाही. अगदी राजकारणाचे चाणक्य म्हणल्या जाणाऱ्या शरद पवारांनाही सलग पाच वर्षे खुर्ची टिकवता आली नाही. सतत मुख्यमंत्री बदलत राहण्याचा इतिहास असल्यामुळं एकाच वर्षी तीन मुख्यमंत्री महाराष्ट्रानं पाहिले,(Maharashtra had seen three Chief Ministers in the same year) त्याची ही गोष्ट

महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक आणि तीन मुख्यमंत्री

१ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातलं सर्वात रंजक वळण होतं १९६२ ची विधानसभा निवडणूक. यामुळं एक महत्त्वाची गोष्ट घडली होती. एकाच राज्याचे तीन मुख्यमंत्री बनले होते. मुंबईच्या द्वीभाषीक महागुजरात राज्यातून मराठी बोलणारं महाराष्ट्र राज्य वेगळं झालं. यामुळं विधानसभा मतदार संघाची रचना बदलणार हे निश्चित झालं होतं. कारण राज्यातल्या दक्षिणेला असणारे धारवाड, विजापूर आणि बेळगाव जिल्हे त्यावेळच्या म्हैसुर राज्यात गेले. यामुळं मतदार संघाची संख्या ३१५ वरुन ३९६ मतदार संघ बनले. याच मतदार संघावर निवडणूक पार पडली.

महाराष्ट्राची स्थापना

देश १९४७ साली स्वातंत्र्य झाला तरी राज्यांना त्यांच्या सीमा आणि ओळख मिळायला मोठा काळ लोटावा लागला. महाराष्ट्राला तर १३ वर्षे लागली. १९६० साली महाराष्ट्र राज्य बनलं पण त्यासाठी मोठा लढा द्यावा लागला होता. महाराष्ट्राची स्थापना करण्यावेळी झालेला संघर्ष स्वातंत्र्य युद्धाची आठवण करुन देणारा आहे. गुजरात आणि महाराष्ट्रा अशा दोन राज्यांना एकत्रित करुन राज्य बनवण्यात आलं होतं. मराठी भाषिमंडळींनी स्वतंत्र मराठी भाषिक राज्याची मागणीला जोर लावला. यानंतर मोठ्या संघर्षानंतर अनेकांच्या हौतात्म्यानंतर महाराष्ट्र मिळाला. महाराष्ट्र राज्यात मध्यप्रांतातील आणि बेरार प्रंतातील आठ जिल्हे आणि हैद्राबादचे पाच जिल्हे मिळवण्यात आले. याआधी १९४६ ते १९५२ अशी चार वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बाळासाहेब खेर होते त्यांच्या नंतर मोरारजी देसाई यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा होती.

नंतर १९६२ ला विधानसभा मतदार संघांची फेररचना होऊन २६४ जागांवर निवडणूक लागली. कॉंग्रेसचा स्वातंत्र्य लढ्यातला पुढाकार आणि तळागाळात पोहचलेली प्रतिमा यामुळं २६४ पैकी २१५ जागांवर कॉंग्रेस विजयी झाली. एकहाती मोठं बहूमत मिळवण्यात कॉंगर्ेसला यश आलं. कॉंग्रेस पाठोपाठ शेतकरी पक्षानं १५ जागा जिंकल्या, जरी शेकाप दुसऱ्या क्रमांकावर असलं तरी दोघांमध्ये २०० जागेंच अंतर होतं. कम्युनिस्ट पक्षानं ९, रिपब्लिक पार्टीनं ३, समाजवादी पक्षानं १ जागा मिळवली तर १५ आमदार त्यावेळी अपक्ष होते. एकूण मतदानाच्या ५५ टक्के

एका वर्षात बदलले तीन मुख्यमंत्री

भारतावर चीननं आक्रमण केलं आणि यशवंतरराव चव्हाणांना(Yashwant Rao Chauhan) मुख्यमंत्रीपद सोडून १९६२ ला दिल्लीत जावं लागलं. चव्हाणांनंतर मारोतराव कन्नमवार यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विदर्भातलं वादळी व्यक्तीमत्त्व म्हणून कन्नमवार यांची ओळख होती. मुख्यमंत्री पदावर बसणारा विदर्भातला पहिला नेता अशी त्यांची ओळख होती. मात्र त्यांनाही मंत्रीपद जास्तकाळ लाभलं नाही. २४ नोव्हेंबर १९६३ ला त्यांना स्वर्गवास झाला. त्यांच्यानंतर पी. के. सावंत ()P.K Sawant_मुख्यमंत्री बनले. एकाच वर्षी महाराष्ट्रातले तीन मुख्यमंत्री बदलले. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पदावर असलेल्या सावंतांना खुर्ची सोडावी लागली ४ डिसेंबरला वसंतराव नाईक यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य बनल्यानंतर झालेल्या निवडणूकीत बॅरिस्टर अब्दूल रहमान अंतुले, शंकरराव चव्हाण सदस्य होते. नंतरच्या काळात दोघांनाही महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button